पुणे - पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळीफाटा शनिवारी दोन तास थबकला. वाहतूककोंडी होऊन दोन्ही बाजूंनी चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे भरउन्हात प्रवासी हैराण झाले.चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार आठ तास काम करतात आणि चार तास वाहतूककोंडीमध्येआपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पुणे-नाशिक महामार्गावरील चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा येथे बेशिस्त वाहनचालकांमुळे वारंवार होणारे अपघात, त्यातून होणारी वाहतूककोंडी वाहनचालक व नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या फाट्यावर सिग्नल, गतिरोधक, वेगमर्यादा व सूचनाफलक, झेब्रा क्रॉसिंग बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दैनंदिन दुचाकी व पादचाऱ्यांचे अपघातात बळी जात असून आणखी किती बळींची प्रतीक्षा करणार, असा सवाल नागरिक करीत आहेत.चाकण एमआयडीसी असल्याने कामगार वाहतूक करणाºया बस, मालवाहतूक करणारी अवजड वाहतूक अधिक असते. या चौकातून जाण्याची सर्वच वाहनांना घाई असल्याने बेशिस्त वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता सर्रास वाहने वेडीवाकडी घुसवतात. या बेशिस्त वाहनचालकांमुळे दैनंदिन दुचाकी व पादचाºयांचे अपघात होऊन बळी जात आहेत.या चौकात वाहतूककोंडी झाल्यास मोशी टोलनाका ते मोई फाटा, तसेच चाकणच्या बाजूला लांबच लांब रांगा लागतात. त्यात रुग्णवाहिकेला मार्ग काढताना सर्कस करावी लागते. या चौकात वाहतूक पोलीस नियुक्त केले नाहीत. बेशिस्त वाहनचालक कोणाच्याही सूचना न जुमानता वाहने वेडीवाकडी घुसवून वाहतूककोंडीला निमंत्रण देत आहेत.चौक सुरक्षित करण्याची मागणीया फाट्यावर टपºया व हॉटेलचे अतिक्रमण वाढले आहे. पथदिवे, सिग्नल, गतिरोधक, वेगमर्यादा व सूचनाफलक त्वरित बसवून सततची होणारी वाहतूककोंडी रोखून चौक सुरक्षित करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग बनकर, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे, श्री समर्थ पतसंस्थेचे संचालक काळूअण्णा मुºहे, विजय मुºहे, प्रवासी आदींनी केली.
पुणे-नाशिक महामार्ग : चिंबळीफाटा चौक दोन तास थबकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 2:48 AM