शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

पुणे-नाशिक महामार्ग जाम

By admin | Published: March 19, 2017 3:50 AM

पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली

काळूस-शिरोली : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. लग्नसराई आणि बंद पडलेल्या वाहनांच्या मालिकेमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. राजगुरुनगर शहराजवळ पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी नित्याचाच विषय बनला आहे. मात्र शनिवारी या एकामागून एक बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीने कहरच केला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँडसमोरील पुलावर एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. त्यानंतर मार्केट यार्डसमोरही एक कंटेनर बंद पडला. पोलीस ठाण्याजवळील पुलावर आयशर टेम्पो राजगुरुनगर सहकारी बँकेसमोर पीएमटी व चांडोली येथेही एक १० चाकी गाडी बंद पडली. ही वाहने एकामागून एक बंद पडल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यातच शनिवारी लग्नाची तिथी असल्याने या भागात असणाऱ्या ८ ते १० लग्नकार्यामुळे वऱ्हाडी मंडळींच्या वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडली. सलग बंद पडलेली वाहने पुलावरील अरुंद रस्ता, लग्नाची तारीख यामुळे वाहतूककोंडी अक्षरश: असह्य असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. कोंडी एवढी जास्त होती, की पुण्याकडून येणाऱ्या राजगुरुनगरच्या प्रवासी, विद्यार्थी तसेच पहिल्या पाळीवरून सुटलेल्या कंपनी कामगारांनी अडीच ते तीन किलोमीटर पायी जाणेच पसंत केले. साधारण १ किलोमीटर वाहन पुढे जाण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास वेळ लागत होता.खेडच्या दोन्ही बाजूस ८ ते १० किलोमीटरपर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड पोलिसांनी वाहतूककोंडी हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही सलग बंद पडत गेलेल्या वाहनांमुळे पोलिसांचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे दिसत होते. राजगुरुनगरजवळील कोंडी कधी फुटणार ? राजगुरुनगरजवळील वाहतूककोंडी नित्याचीच आहे. कोंडीवर बाह्यवळण मार्ग तसेच केदारेश्वर पूल हे पर्याय आहेत, मात्र हे पर्याय उपलब्ध होण्यासाठी दीड-दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या भागातील लग्नकार्यालये रस्त्याकडेची अनधिकृत व्यावसायिक बांधकामे तसेच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत आहे. यावरही उपाय होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.