- किरण शिंदे पुणे - स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकतेच सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक गाणे पोस्ट केले. या गाण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरू झाला आहे. यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कुणाल कामराला पाठींबा दिला जात असून शिंदेंवर टीका केली जात आहे. तर अशात पुण्यात कुणाल कामरा प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं शिवसेनेला डिवचलं आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, आपण चिकटवलंय"; संभाजी भिडेंचे विधानठाणे, रिक्षा, चष्मा ,दाढी , गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का ?" असा प्रश्नही या बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. बॅनरवर एकनाथ शिंदे यांच्यासह कुणाल कामरा यांचा फोटोही लावण्यात आला आहे. अलका चौकात लावलेल्या होर्डिंगवर रिक्षा, गुवाहाटी, दाडी, चष्मा आणि गद्दार या शब्दाला महाराष्ट्रात बंदी आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या होर्डिंगची चर्चा काल दिवसभर शहरात रंगली होती. यानंतर आता पोलिसांनी या होर्डिंग लावणाऱ्या अज्ञाता विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.