शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका

By नम्रता फडणीस | Updated: March 23, 2025 14:04 IST

पत्नीला दरमहा 35 हजार रुपये अंतरिम पोटगीसह खोलीचा ताबा देण्याचे आदेश

पुणे : दोघांची ओळख एका संकेतस्थळावर झाली. दोघांचेही हे दुसरे लग्न. तो लग्नाच्या तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला गेला; पण तिला परत घ्यायला आलाच नाही. कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी न्यायालयात दाखल प्रकरणात पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच दणका दिला.पत्नीला २७ डिसेंबर २०२१ पासून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत दरमहा ३५ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले. याखेरीज, वाकड येथे असलेल्या सदनिकेमध्ये पत्नीस एक खोली पंधरा दिवसांच्या आत राहण्यासाठी द्यावी, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले.

राकेश आणि स्मिता (दोघांचीही नावे बदलेली) यांची ओळख लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावर झाली. त्यानंतर त्यांनी ५ डिसेंबर २०१६ रोजी लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षांनंतर राकेश याने ऑस्ट्रेलियाला जायचे असून त्याठिकाणी शिक्षण घेऊन नोकरी करायचे असल्याचे स्मिताला सांगितले, तसेच नोकरी लागल्यानंतर तुला घेऊन जाईन, असा विश्वासही दिला. यावेळी त्याने आई-वडील नाशिकला जाणार आहेत, तर तू सदनिकेत एकटी कशी राहशील, त्यापेक्षा तू दुसरीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहण्यास जायला सांगितले. त्यानंतरही राकेश स्मिताला घेण्यास आला नाही. याउलट, त्याचे आई-वडील पुन्हा सदनिकेत राहण्यास आले. मात्र, तिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला घरात घेतले नाही.

त्यानंतर, स्मिता हिने ॲॅड. सोनाली आरू, ॲॅड. प्राची जमदाडे यामार्फत दैनंदिन खर्चाकरिता दरमहा एक लाख रुपये अंतरिम पोटगीसह वाकड येथील सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला. यावेळी स्मिता व राकेश या दोघांनीही मालमत्ता, उत्पन्न व खर्चाचे विवरण प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. राकेश हा स्थापत्य अभियंता असून त्याने ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले आहे. तेथे त्याला अडीच ते तीन लाख रुपये दरमहा उत्पन्न मिळते.त्याचे पुण्यासह नाशिक येथे घर आहे. लग्नानंतर त्याने कधीही ऑस्ट्रेलिया येथे घेऊन गेला नाही. याखेरीज, स्मिताने दरमहा तीस हजार रुपये आपल्याला खर्च येत असून आपल्या नावावर ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले. राकेश याच्या मार्फत दाखल कागदपत्रांमध्ये उत्पन्न, दायित्व व खर्चाचे विवरण नसल्याने न्यायालयाने स्मिताचे म्हणणे ऐकून घेत तिच्या बाजूने निकाल दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय