शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन  

By राजू इनामदार | Updated: March 28, 2025 12:03 IST

१०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेश

पुणे : मागील शतकातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक कार्स आणि मोटारसायकलींचे अनोखे प्रदर्शन ‘विंटेज अँड क्लासिक कार/मोटर सायकल एनवल फिएस्टा २०२५’ पुण्यात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन शनिवार, २९ मार्च आणि रविवार, ३० मार्च २०२५ रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC), पुणे येथे पार पडणार आहे. वाहनप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार असून, शनिवारी सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.  

१०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेशया प्रदर्शनात १०० दुर्मिळ आणि ऐतिहासिक विंटेज व क्लासिक कार्स, तसेच १०० विंटेज स्कूटर्स आणि मोटारसायकली पाहायला मिळणार आहेत. भारताच्या समृद्ध वाहन परंपरेला उजाळा देणाऱ्या या प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक आणि सेलिब्रिटींनी वापरलेल्या कार्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.  
प्रदर्शनातील खास आकर्षणे- भारताची सर्वात जुनी धावणारी १९०३ची "हंबर" कार – अब्बास जसदानवाला, मुंबई  - नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे – सुभाष सणस  - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कन्व्हर्टेबल इंपाला- अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज आणि विनोद खन्ना यांची सिल्व्हर मर्सिडीज- बाळासाहेब ठाकरे यांची २००९ मर्सिडीज-बेंझ- अल पचिनो यांची मर्सिडीज-बेंझ आणि ब्रुनेईच्या राजांची १९८१ मर्सिडीज लिमोझिन- १९३८ ची सर्वात जुनी नॉर्टन ५०० मोटारसायकल  - "बॉबी" फेम राजदूत मोटारसायकलमहत्वाचे आयोजक आणि पुरस्कार वितरणया कार्यक्रमाचे आयोजन विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA), मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट विंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.  

 

पुणेकरांसाठी ऐतिहासिक पर्वणीहे प्रदर्शन  नागरिकांसाठी विनामूल्य खुले  असून, वाहनप्रेमींना जुनी आणि दुर्मिळ वाहने जवळून पाहण्याची ही एक अनोखी संधी आहे. पुणेकरांनी या भव्य सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcarकार