पुणे - धायरी येथील पार्क व्हिव सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका चिमुकल्याचा स्विमींग पूलमध्ये पडून मृत्यु झाला. ही हृदयद्रावक घटना काल संध्याकाळी आठच्या सुमारास घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे नाव निनाद गोसावी (वय ६ वर्ष) आहे. निनाद आठच्या सुमारास सोसायटी परिसरात मित्रांसोबत खेळत होता. यानंतर बराच वेळ घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरु केली.
मात्र तब्बल दोन तासांच्या शोधमोहीमेनंतर तो सोसायटीच्या स्विमींग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला. या घटनेने संपूर्ण सोसायटीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सोसायटीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.