शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
3
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
4
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
5
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
6
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
7
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
8
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
9
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
10
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
11
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
12
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
13
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
14
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
15
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
16
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!
17
"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."
18
ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."
19
बाजारात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, थोडीशी नजरचूक पडू शकते महागात, सरकारने दिला अलर्ट 
20
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना

लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:32 IST

- वनपुरी ग्रास्थांचा निर्धार : विश्वासात न घेता आमची भूमिका समजून न घेता प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप

सासवड : महाराष्ट्र शासनाने स्थानिक प्रकल्पबाधित नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता प्रकल्पबाधितांची भूमिका समजून न घेता सदर प्रकल्प शासन लादत असून, तो आमच्यावर अन्यायकारक आहे. गावात विमानतळ प्रकल्प करण्याचा कितीही निर्धार केला आणि कितीही प्रयत्न केले तरी कोणत्याही परिस्थितीत शांततेच्या मार्गाने त्यास विरोध केला जाईल. वेळ पडल्यास लाठ्या, काठ्या खाऊ पोलिसांच्या गोळ्या झेलू, परंतु विमानतळ प्रकल्प होवू देणार नाही. एमआयडीसीच्या माध्यमातून शासन दररोज एक एक घोषणा करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प हद्दपार करणारच असा ठाम निर्धार वनपुरी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या सात गावांत विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून, यासाठी २,८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामुळे सातही गावे कायमची विस्थापित होण्याचा धोका व्यक्त करीत सातही गावातील नागरिकांनी सुरुवातीपासून कडवा विरोध केला आहे. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांचा विरोध झुगारून दररोज नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, प्रकल्प हद्दपार होण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करू मात्र प्रकल्प होवू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना 

वनपुरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रकल्पाला विरोध करताना माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांनी शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. ग्रामस्थांनी राजकीय गट, तट, एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून एक होण्याचे त्यांनी आवाहन केले. आपण आता भांडत बसलो आणि शासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर भविष्यात आपण एकमेकांत राहणार नाही. कायमचे विस्थापित व्हावे लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून आपला लढा सुरु ठेवायचा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.

यावेळी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर, माजी सरपंच नामदेव कुंभारकर, महादेव कुंभारकर, ज्ञानदेव कुंभारकर, सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, सोमनाथ कुंभारकर, विकास कुंभारकर, सयाजी कुंभारकर, दिलीप कुंभारकर, अंकुश कुंभारकर, लंकेश महामुनी, बाळासाहेब हगवणे, महेश मगर, शांताराम कुंभारकर, युवा कार्यकर्ते राजेंद्र कुंभारकर, सुनील कुंभारकर, सखाराम कुंभारकर, सुनील गायकवाड, संजय कुंभारकर, अशोक कुंभारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या जमिनीवर शासन परस्पर प्रकल्प उभारत असेल आणि आम्हाला कायमचे विस्थापित व्हावे लागत असेल तर असे प्रकल्प आम्हाला नको आहेत. आमच्या जमिनी काढून घेतल्यावर कोठे जायचे आणि कसे राहायचे? अनेक संघटना नाव बदलासंदर्भात मागण्या करत आहेत. मुळातच विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे नामकरण विमानतळाचे घोषणेवेळीच झालेले आहे. तालुक्यातील यापूर्वी अनेक गावांनी विमानतळ व्हावा म्हणून ठराव दिले होते. त्यांनी त्यांचे गावात विमानतळ करावा .. - संतोष हगवणे, बाधित प्रकल्पग्रस्त

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडairplaneविमान