शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:41 IST

आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिकच; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलून दाखविली मनातील खदखद

पुणे : कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणारे आणि सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री यांनी समज दिल्यानंतर आता त्यांना मंत्रिपद औटघटकेचे वाटू लागले आहे. मला मंत्रिपदाचे काही वाटत नाही, अशी निरवानिरवीची भाषा कोकाटे यांनी बोलून दाखविली आहे. चार-दोन गोष्टी चुकू शकतात, मी पण सामान्य माणूसच आहे, अशी उपरती कोकाटे यांना आली आहे. यामागे आपला हेतू स्वच्छ होता, अशी सारवासारवही केली आहे. यावरून कोकाटे मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.पुण्यात बुधवारी (दि. ९) कृषी विभागातर्फे आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. त्यापूर्वी कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्री काही काळासाठी असतो, मंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी कायमस्वरूपी नसते, त्यामुळे आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिक असतो, या वक्तव्यावर कोकाटे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. शेतकरी अनेक वर्षे कर्जाची परतफेड करत नाहीत आणि कर्जमाफीची वाट बघतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास त्यातून ते साखरपुडे आणि लग्न करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोकाटे चांगलेच अडचणीत आले. त्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच आगपाखड केली. मंत्रिमंडळातील सहकारी पक्षाचा मंत्री या नात्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. उपमुख्यमंत्री यांनीही पुण्यात पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना तोलूनमापून बोलावे असा सल्लाही दिला. त्यानंतर पवार यांनी कोकाटे यांना प्रत्यक्ष बोलावून चांगलीच समज दिल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांना ही उपरती झाली आहे.आपण काय काम करतो, आपल्याला काय जबाबदारी दिली आहे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्रिपद औटघटकेचे आहे. मंत्रिपदाचे आपल्याला काही वाटत नाही. मंत्रिपदाबाबत मला फार अपेक्षित नव्हते. आपल्याला काही वेगळे मिळवायचे आहे, असे काही नव्हते, जी जबाबदारी पक्षाने, नेत्याने व समाजाने दिली ती कर्तव्यभावनेने पार पाडायची आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रManikrao Kokateमाणिकराव कोकाटे