शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 8:52 PM

पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दोन दिवस संचारबंदीची अंमलबजावणी करताना पोलिसांनी जनजागृतीची भूमिका घेतली होती. मात्र, आता मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. 

पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आता मंगळवारपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. याबाबत डॉ. शिसवे यांनी सांगितले की, लोकांना या आदेशांची माहिती व्हावी, यासाठी गेले दोन दिवस पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला होता. पुणेकरांनीही या आदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व आस्थापना दुकानदार स्वत: हून बंद करीत आहेत. कामावरुन घरी जाणार्‍या कोणालाही अडविण्यात येत नव्हती. त्यांच्याकडे चौकशी करुन उद्यापासून उशीर करु नये, अशा सूचना करण्यात येत होत्या.

शहरातील ९६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना आता बाहेर पडण्याचे काम राहणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जे कारणाशिवाय घराबाहेर पडलेले आढळून येतील. त्यांच्यावर १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. .......गेल्या दोन दिवसात पोलीस व्हॅनवरील पी ए सिस्टीमद्वारे नागरिकांना संचारबंदीचे आवाहन केले. लोक कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याची चौकशी केली. त्यात प्रामुख्याने बाहेरगावांहून आलेले प्रवासी, रुग्णालयातील रुग्णांसाठी डबा घेऊन जाणारे नातेवाईक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर जाणारे व येणारे प्रवासी, तसेच डॉक्टरांकडे जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आढळून आले. वैध कारणे असलेल्यांना नाकाबंदीत चौकशी करुन सोडण्यात येत होते. विनाकारण बाहेर पडलेल्या काहींवर या दोन दिवसात कारवाई करण्यात आली. ...........नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावेकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक त्या उपाय योजना आखल्या असून पोलीस संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन कारवाईची वेळ आणू नये.अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे़ ...........साडेतेरा कोटी दंड वसुलीरविवारी शहरात ८१४ जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. पुणे शहरात आतापर्यंत २ लाख ७७ हजार ९९० जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ कोटी ५२ लाख ८७ हजार ३०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCrime Newsगुन्हेगारी