शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Pune Night Curfew : ... तर संचारबंदीचा तुम्हाला त्रास होणार नाही; पुणे पोलिसांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 9:27 PM

प्रसंगी नागरिकांना घरी सोडण्याचेही दिले आश्वासन : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीसारखे कडक पाऊल उचलले असले तरी त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नसे, याविषयीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. या बाबीकडे पोलीस अधिक संवेदनशीलतेने पाहणार आहेत. महापालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणाचीही अडवणूक करण्यात येणार नाही, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी महापालिकेच्या आदेशात पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही. सायंकाळी ६ ते सकाळी ६ याकाळात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांनी नेमके काय करायचे. त्याचबरोबर पुण्यातून बाहेर जाणार्‍यांनी काय करायचे. याविषयी स्पष्टता नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. बाहेर गावाहून येणार्‍यांना घरी जाण्यासाठी वाहन मिळेल का, त्यांना घेऊन येण्यासाठी जर कोणी घरातून बाहेर पडला तर त्याला अडविणार का असे असंख्य प्रश्न पुणेकरांच्या मनात महापालिकेच्या आदेशाने निर्माण झाले आहेत. 

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. शिसवे यांनी सांगितले , शहरात ज्या वेगाने शहरात कोरोनाचा प्रसार होतोय, तो रोखण्यासाठी, त्याला अटकाव घालण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. आज पहिल्या दिवशी बहुतांश पुणेकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. बहुतांश दुकाने, व्यापारी पेठा सायंकाळी ६ वाजण्याच्या आत बंद झाल्या. 

पोलिसांनी सायंकाळी ४ वाजल्यापासूनच संचारबंदीबाबत पोलीस व्हॅनवरील पी ए सिस्टिमद्वारे अनॉऊसमेंट करायला सुरुवात केली होती. तसेच शहरातील ९६ महत्वाच्या चौकात बॅरिकेट लावून नाकाबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीचा उद्देश विफल करणार्‍या व विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामावरुन घरी परत जाणार्‍यांची कोणतीही अडवणूक करण्यात येणार नाही़ मात्र, त्याने स्वत: जवळ योग्य ओळखपत्र, जेथे काम करतात, त्या ठिकाणचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे.

हॉटेल, रेस्ट्रॉरंट बंद असल्याने एकत्र येण्यांचे प्रमाण सायंकाळी सहानंतर कमी असणार आहे. तातडीच्या कामासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. 

मेट्रो, बांधकाम साईटवर अनेक असंघटीत मजूर, कामगार काम करीत असतात, त्यांनी आपल्या कामगारांना पत्र द्यावे, असे आवाहन आम्ही केले आहे. तसेच आज पहिलाच दिवस असल्याने लोकांना समजावून सांगणे, जनजागृती करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले. ......सायंकाळी ६ नंतर बाहेर पडायचे असेल तर हे जवळ बाळगा* अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगा.* रुग्णालयात जायचे असेल, रुग्णाला भेटायचे असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र, डॉक्टरांचे, हॉस्पिटलचे पत्र जवळ ठेवा* बाहेरगावी जायचे असेल तर संबंधित गाडीचे तिकीट जवळ बाळगा.* कामावरुन उशिरा घरी जावे लागणार असेल तर जेथे काम करता त्या ठिकाणचे ओळख पत्र, कंपनीचे उशिरापर्यंत कामावर थांबावे लागत असल्याचे पत्र जवळ ठेवा.* पत्र नसेल तर वरिष्ठांचा व्हॅटसअ‍ॅप मेसेज चौकशी केली तर दाखवा.* जवळच्या गावातून कामानंतर घरी परत येत असाल, तसे कंपनीचे पत्र जवळ बाळगा. ..........प्रसंगी पोलीस वाहनांनी घरी पोहचवूसंचारबंदी काळात वैध कारणासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार आहे. अगदीच कोणाची अडचण असेल तर प्रसंगी पोलीस वाहनांमधुन त्यांना योग्य त्या ठिकाणी पोहचवले जाईल. मात्र, कोणाची अडचण होऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसcommissionerआयुक्त