पुणे : एकीकडे आम्ही पुणे शहरात सर्वत्र २४ तास समान पाणीपुरवठा होईल असे चित्रे पुणे महानगरपालिका रंगवीत आहे. त्यासाठी पैसे नसताना कर्जरोखे काढून योजना राबविण्याचे प्रयत्न चालू आहेत. मात्र, जे पाणी शहरासाठी येते व ज्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना होत आहेत्याचा कुठलाही हिशेब पाणीपुरवठा विभाग ठेवत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्त्या कानिझ सुखराणी व आशिष माने यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीत पाणीपुरवठा विभागाचा आंधळा कारभार उजेडात आला आहे. पुणे शहरात विविध पंपिंग स्टेशन्स, पाण्याच्या टाक्या तसेच इतर ठिकाणांहून पाण्याचे वाटप होते तेथे पाण्याचा दाब कसा मोजला जातो याविषयी विचारलेल्या माहितीला पाण्याचा दाब मोजण्याची यंत्रणा अद्यापपर्यंत कुठेही बसवण्यात आली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने लेखी दिले आहे.मुख्य वितरण नलिकांवर वितरित होणारे पाणी मोजण्याचे मीटर अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. परंतु समान पाणीवाटप योजनेचे अंतर्गत मीटर बसविण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे. याचा अर्थ आजपर्यंत शहरातील पाणी वितरण करणाºया कोणत्या जलवाहिनीतून किती पाणी जाते याचा कसलाही हिशेब ठेवला जात नाही.वितरण नलिकांवर पाणी मोजण्याचे मीटर बसविल्यावर, वितरित होणाºया पाण्याचे मोजमाप ठेवणे शक्य झाले असते. पाण्याची आकारणीदेखील योग्य पद्धतीने झाली असती परंतु या महत्त्वाच्या घटकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे काम वर्षानुवर्षे होत आहे.पुणे शहरात मर्यादेपेक्षाजास्त पाणी वापरत असल्याचा आधीच जलसंपदा विभाग आक्षेप घेत असताना मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराची पोलखोल डोळे उघडणारी आहे.पाणीगळतीवर पाणीपुरवठा विभागाचा काहीही कंट्रोल नाही. शहरात सर्वसाधारणपणे४० टक्के पाण्याची गळती होते, असे असताना निदान मुख्यपंपिंग स्टेशन्सवर तरी मीटर लावणं आवश्यक होतं.सर्वसामान्य नागरिकांना समान पाणी योजनेत मीटरने पाणी घेणं बंधनकारक करण्याचं नियोजन करणारा पाणीपुरवठा विभाग स्वत: मात्र मीटरच वापरत नाही.
पुणे: पालिकेकडे नाही पाण्याचा हिशेब :आंधळा कारभार उजेडात , २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 6:11 AM