पिंपरी : महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यात केलेल्या सुधारणांनुसार लोकसंख्येच्या तुलनेत नगरसेवक संख्या नव्याने निश्चित करणारा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. त्यानुसार २४ लाख लोकसंख्या असलेल्या महापालिकांसाठी नगरसेवकांची संख्या १४५ऐवजी १५१ केली आहे, तर ३० लाख लोकसंख्येसाठी नगरसेवकांची संख्या १६१ केली आहे. त्यावरील प्रत्येक एक लाख लोकसंख्येला एक अतिरिक्त सदस्य असणार आहे. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १६२ होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या २० लाखांच्या आत असल्याने नगरसेवकांची १२८ ही संख्या जैसे थे राहणार आहे.
पुण्यात नगरसेवकांची संख्या दहाने वाढणार
By admin | Published: June 19, 2016 4:44 AM