पुणे-पंढरपूर पालखी मार्गावर जेजुरी ते नीरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत होते. त्याबाबत लोकमतमध्ये वृत्त छापून आले होते. त्याची दखल घेत वाल्हे परिसरातील तरुणांनी हे खड्डे बुजवून प्रवाशांच्या जिवावर बेतणारे संकट टाळले. खड्डे बुजविण्यासाठी नक्षत्र कन्स्ट्रक्शन दौंडज यांच्याकडून सिमेंट, वाळू मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या वेळी दौंडज ग्रामपंचायत सदस्य विजय फाळके, सामाजिक कार्यकर्ते शरद जाधव, खंडू जाधव, विजय भोसले, प्रीतम जाधव, अक्षय कदम, नितीन शिंदे यांनी खड्डे बुजवण्याचे काम केले. तरुणांच्या या कामाचे ग्रामस्थ व प्रवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे.
--
०२ वाल्हे रस्ता
पालखी महामार्गावरील खड्डे बुजविताना युवक.
020921\02pun_1_02092021_6.jpg
०२ वाल्हे रस्तापालखी महामार्गावरील खड्डे बुजविताना युवक