पुणे: शहरात शनिवारी झालेल्या पावसाने पुणेकरांची दाणादाण उडाली. अनेक भागात गुडग्यापर्यंत तर काही भागात कमरे इतके पाणी साचून पुणे शहर पाण्यात गेल्याचा अनुभव सर्वानीच घेतला. पण याचे काहीच देणेघेणे महापालिका प्रशासनाला नसल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी महापालिका इमारतीसमोर होडीत बसून, महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा मनसेकडून निषेध करण्यात आला. पुणे शहराच्या रस्त्यावर पूर आल्याने महापालिकेच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडले आहे. पुणे शहरात झालेल्या पावसामुळे सखल भागात रस्ते चौक जलमय झाले अनेक घरांमध्ये पाणी घुसले,झाडे पडली,वाहतुक कोंडी, सिग्नल यंत्रणा बंद पडली. दरम्यान प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष कागदावरच असल्याचे दिसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
Pune MNS: पावसाने पुणेकरांची दाणादाण; मनसेचे होडी घेऊन महापालिकेसमोर आंदोलन
By निलेश राऊत | Published: June 10, 2024 6:59 PM