शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:01 PM

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देतुकाराम मुंढे यांची अध्यक्षपदी निुयक्ती झाल्यानंतर यंत्रणेत आमूलाग्र बदलनोव्हेंबरपर्यंत तिकीट विक्रीतून १ कोटी २० लाख रुपयांचे दैनंदिन उत्पन्न

पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील काही महिन्यांपासून मार्गावरील बस, प्रवासी संख्या, उत्पन्नामध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना दिसत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे. ‘पीएमपी’ची निर्मिती झाल्यापासून विविध कारणांमुळे तोट्यात भर पडत गेली. राजकीय हस्तक्षेप आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना काम करताना येणाऱ्या मर्यादा, निधीची कमतरता, बसेसच्या दुरवस्थेमुळे वाढणारा तोटा, रखडलेला आस्थापना आराखडा, बेशिस्त, ठेकेदारी पद्धतीमुळे वाढलेला खर्च अशी विविध कारणे पीएमपीच्या अधोगतीला जबाबदार ठरली. त्यातच अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांची पूर्णवेळ नियुक्ती केली जात नव्हती. तुकाराम मुंढे यांची मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अध्यक्षपदी निुयक्ती झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासून यंत्रणेत आमूलाग्र बदल करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे झालेला बदल आता प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. कर्मचारी-अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यापासून मार्गावर बस वाढविणे, बसेसची स्थिती सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर वेग आणल्याने स्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे.पीएमपी प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत मार्गावरील बस संख्येत वाढ झाली आहे. मुंढे यांनी पदभार स्वीकाला त्या वेळी एप्रिल महिन्यात दैनंदिन बसची संख्या १३६८ एवढी होती. नोव्हेंबर महिन्यात हा आकडा १४४० वर पोहोचला आहे. सरासरी दैनंदिन तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात सात लाखांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरपर्यंत तिकीट विक्रीतून १ कोटी २० लाख रुपयांचे दैनंदिन उत्पन्न मिळत आहे. तर पाससह इतर बाबींमधून मिळणारे एकूण उत्पन्न सुमारे दीड कोटी रुपये आहे. एका बाजूला उत्पन्न वाढत असताना प्रवाशी संख्याही वाढत चालली आहे.  

तीन वर्षांतील नोव्हेंबर महिन्याची स्थिती                                                      २०१५               २०१६                  २०१७मार्गावरील सरासरी बस                    १४३१               १३७१                   १४२२एकूण उत्पन्न                                  ४५५२७२७९६    ४४३६३८३८५         ४६५७८३९९एकूण दैनंदिन प्रवासी                       १११५९७७         १०६७४१६             ११६८५१३

प्रवाशांमध्ये वाढ

पीएमपीची तुलनात्मक स्थिती                                                                            २०१६                   २०१७मार्गावरील सरासरी बस                                           १३८४                    १४२४एकूण किलोमीटर                                                    ७,२८,६८,६५६        ७,६४,३५,९५३तिकीट विक्रीतून उत्पन्न                                         २७५,९७,०६,२१५    २९३,२६,३४,३९६तिकीट विक्रीतून दैनंदिन उत्पन्न                            १,१३,१०,२७१         १,२०,१८,९९३एकूण उत्पन्न                                                         ३५०,६१,१५,७९५     ३६७,४५,४६,९७५एकूण दैनंदिन उत्पन्न                                            १,४३,६९,३२७         १,५०,५९,६१९एकूण दैनंदिन प्रवासी                                              १०,१८,७९१            १०,६६,१०२

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढे