पुणे : पुणे शहरात पोलिसांनी संचारबंदी जाहीर केली असून कोणत्याही खासगी वाहनांना रस्त्यावर येण्यास मनाई केली आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी चार व्हाट्सअॅप क्रमांक जाहीर केले आहेत. ९१४५००३१००८९७५२८३१००९१६९००३१००८९७५९५३१००नागरिकांनी या मोबाईल क्रमांकावर आपले संदेश पाठवावेत. नागरिकांच्या शंकांना अथवा सूट देण्याच्या विनंतीवरील उत्तर त्यांना त्याच व्हॉट्सअॅप क्रमांकावरुन संदेश स्वरुपात पाठविले जाईल. सुट ही केवळ अपवादात्मक परिस्थितीत दिली जाईल, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे, अशी माहिती पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी कळविले आहे.
*आपत्कालीन सेवेसाठी डायल रिक्षासंचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळणे तसेच त्यांच्या सुविधेसाठी आपत्कालीन व वैद्यकीय सेवेतील बाब म्हणून डायल रिक्षा (९८५९१९८५९१) या अॅपद्वारे पुरविल्या जाणार्या प्रवासी वाहतूक सेवेचा उपयोग नागरिक करु शकतील. परंतु,ही सेवा फक्त रुग्ण वाहतूक व अतितातडीच्या प्रसंगीच वापरता येईल. दुरुपयोग केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकेल.
* साखगी सुरक्षा रक्षकांना सवलतविविध संस्था, कंपन्या तसेच निवासी संकुलांच्या खासगी सुरक्षा रक्षकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांच्या सुविधेसाठी विशेष बाब म्हणून त्यांच्या प्रवासी वाहतूक सेवेसाठी वापरल्या जाणार्या वाहनांना मर्यादित स्वरुपात सवलत असणार आहे.तसेच जीवनाश्यक बाब म्हणून स्विगी, झोमॅटो तसेच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम इतर जीवनाश्यक वस्तूंच्या घरपोच पुरविल्या जाणार्या सेवांसाठी त्यांचे वाहन वाहतुकीला परवानगी देण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.