शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई, २ सराईत दरोडेखोर जेरबंद; ४ मोठे गुन्हे उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 11:17 PM

पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी  कारवाई केली आहे.

बारामती दि २७ (प्रतिनिधी )पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी  कारवाई केली आहे. पोलिसांनी इंदापूर काटी येथील दरोडा आणि वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी असे चार गुन्हे उघड करीत दोघा दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर पोलिस स्टेशन ठाण्यात  दाखल गुन्ह्यात आरोपीनी काटि येथे  दरोडा टाकताना  दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश केला .  फिर्यादी महिला आणि घरात असलेली लहान मुलीला  कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या चांदीचे दागिने  आणि  मोबाईल असा एकूण १ लाख ७ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात देखील आरोपींनी  कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने , २  मोबाईलसह ऐकून २लाख १६ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता .

सर्व गुन्ह्याचा  समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही  फुटेज तपासले. तसेच रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेतली. यावेळी गोपनीय माहितीवरून विकास किरण शिंदे (वय २५, वर्षे रा. नांदल ता.फलटण जि.सातारा) , रावश्या  कोब्या काळे (वय २५ वर्षे रा.काटी ता.इंदापूर जि. पुणे )यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता वरील दोन्ही ठिकाणचे दरोडे आणि घरफोडी तसेच जबरी चोरीचा गुन्हा कबुल केला आहे. 

दोन्ही आरोपींना पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे. पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदशनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट  पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे , पोलिस हवालदार अनिल काळे,  रविराज कोकरे पोलिस नाईक राजू मोमिन, विजय कांचन, अभिजित एकशिंगे, धिरज जाधव तसेच वडगाव  निंबाळकर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी