पुणे: पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने निष्पाप दोघांना जीव गमवावा लागला. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या बापावर मुलाला चारचाकी वाहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता, तर दोघांचा जीव घेणाऱ्या त्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयाने काही अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला होता. त्यावरून पुणे पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले.
या प्रकरणानंतर पुणे पोलीस खडबडून जागे होऊन तपासाला सुरुवात केली. मात्र अजूनही सर्व प्रश्न निरुत्तर असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिसून आले आहे. अमितेश कुमार यांना येरवडा पोलीस ठाण्यातील पिझ्झा बर्गर प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले कि, पिझ्झा पार्टी झाल्याचं तपासात आढळून आलं नाही, त्या आरोपात अजिबात तथ्य नाही. येरवडा पोलीस ठाण्यातच काय घडलं याची चौकशी केली जात आहे. ब्लड रिपोर्टबाबत काय झालं? असे विचारले असता ते म्हणाले, ब्लड रिपोर्ट अजूनही आले नाही. डीएनए प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते मिळणार नाहीत. मात्र ते दारू पितानाचे सिसिटीव्ही आमच्यकडे आहेत. त्याचीही चौकशी सुरु आहे. तसेच वडील आणि मुलाच्या दोन्ही केसचा तपास संवेदनशीलतेने सुरु आहे. लहान मुलांना दारू देणे, पालकांनी त्याला गाडी देणे, या सर्व बाबतीत क्राईमबरंच कडून तपास सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आपल्या कृत्यामुळे अपघात होईल याची आरोपीला जाणीव होती. आरोपी बाहेर पडल्यापासूनच्या घटनाक्रमाचाही तपास सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच या दोन्ही केसचे पुरावे नष्ट झाले का याची चौकशी सुरु आहे.
घटनेनंतर ३०४ कलम वाढवण्यात आला होता. त्यादिवशी आम्ही बाळ हक्क न्यायालयाकडे अर्ज केला होता. त्याला आम्ही रिमांड होमला पाठवण्यासाठी सांगितले होते. असा आमचा आग्रह होता. परंतु दोन्ही ऑर्डर कोर्टाने फेटाळले. त्यावेळी आम्ही सत्र न्यायालयात अपील करणार होतो. त्यानंतर आम्ही बाळ हक्क नायायालयात पुन्हा गेलो. आम्हाला त्यांनी ४ जूनपर्यंत मुलाला बालसुधार गृहात ठेवण्यात सांगितले. तर विशाल अग्रवालला पोलीस कोठडी देण्यात अली होती. आम्ही दोन्ही केस संवेदनशीलतेने तपासत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.