पुणे : सध्या शहरात अनेकांची ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या तक्रारी पोलिसांत येत आहेत. ऑनलाईन वस्तू खरेदी करताना किंवा विकताना अनेकांची फसवणूक होते. ती झालेली फसवणूक उघड झाल्यानंतर नागरिक पोलिस स्टेशनची वाट धरतात. याबद्दल नागरिकांनी जागरुक होण्यासाठी आणि ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) आवाहन केले आहे. त्याबद्दलचे ट्विट पुणे पोलिसांनी केले आहेत.
पहिल्या ट्विटमध्ये टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांचा फोटो वापरत ऑनलाईन खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये महेंद्रसिंह धोनीचा फोटो वापरत कोणते आणि कशाप्रकारचे पासवर्ड ठेऊ नये याबद्दल सांगितले आहे.
मागील काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.