शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुणे पोलिसांचा पाच महिन्यांत  तब्बल १३३७ जणांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 2:03 PM

पोलीस गुन्हेगारांना शोधण्याबरोबर अनेक छोटी मोठी कामे करत असतात़. पण त्याची कोणी दखलही घेत नसते.

ठळक मुद्देपोलीस मदतीला धावून येतील, ही भावना नागरिकांच्या मनात वाढीसआपण एखादे चांगले काम केले तर त्याचे कौतुक होतेय, ही भावना पोलिसांच्या मनात निर्माण

पुणे : रस्त्यात आढळलेल्या ७० वर्षाच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात केले़ दाखल, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारी असलेल्या तरुणाला जीवदान ..... अशा एक ना अनेक गोष्टी शहर पोलीस करत आहेत़. नागरिक कधीही अडचणीत सापडले की त्यांना सर्वप्रथम आठवतात, ते पोलीस व १०० क्रमांक़ पण तेथून मदत मिळेलच याची यापूर्वी खात्री नव्हती़. पण आता पुणेकरांना पोलीस मदतीला धावून येतील, याची खात्री वाटू लागली आहे़. गेल्या पाच महिन्यात शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अशा अडचणीत आलेल्या तब्बल १ हजार ३३७ जणांना मदतीचा हात दिला आहे़. पोलीस गुन्हेगारांना शोधण्याबरोबर अनेक छोटी मोठी कामे करत असतात़. पण त्याची कोणी दखलही घेत नसते.शहर पोलीस इतकी सर्व कामे करत असतात, याची कोणाला माहितीही नव्हती़. तसेच हे काम आपले आहे, आपल्याकडे मदतीला आलेल्या नागरिकांना आपण सहाय्य करु शकतो, त्यांची समस्या ही किरकोळ असली तरी त्यांच्या दृष्टीने सध्या ती सर्वात मोठी आहे, हेही यापूर्वी पोलिसांच्या गावी नव्हते़. त्यांना त्यासाठी कोणी प्रोत्साहितही आजवर केले नव्हते़. त्यामुळे अशा किरकोळ गोष्टीकडे पोलीस चौकी पातळीवर, पोलीस ठाण्याच्या पातळीवर ते गांभीर्याने घेतले जात होतेच असे नाही़. पोलीस आयुक्त म्हणून डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्वसामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना कामासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला़. शहरात चोऱ्या, खुन, जबरी चोरी असे गुन्हे होत राहणाऱ पण, त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेतली पाहिजे़. त्यांनी नागरिकांना मदत करावी, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांना प्रयत्न करण्याची प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले व अशी चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली़. पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाची माहिती प्रसार माध्यमाकडे पाठविण्यास सुरुवात केली़. वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल हे दखल घेतील अथवा नाही आपण आपले काम करत राहायचे असे त्यांनी सांगितले़. त्यानुसार दर आठवड्याला ते प्रत्येक पोलीस ठाण्याचा आढावा घेऊ लागले़. त्याचा चांगला परिणाम सर्व पोलीस दलात अशा कामाची चर्चा होऊ लागली़. पोलीसही आपल्याकडे आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात रुची दाखवू लागले़. त्याचा चांगला परिणाम शहरात दिसू लागला़. एरवी मोबाईल फोन चोरीला गेला तर अगदी थंड चेहऱ्याने पोलीस चौकीतील कर्मचारी वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंडला तक्रार द्या असे सांगत असत़. आता त्यात बदल झाला आहे़. हरविलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात येऊ लागले़. वृत्तपत्रांनीही पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल घेण्यास सुरुवात केली़. पोलीस मदतीला धावून येतील, ही भावना नागरिकांच्या मनात वाढीस लागली़. त्याचबरोबर आपण एखादे काम केले तर त्याचे कौतुक होतेय, ही भावना पोलिसांच्या मनात निर्माण करण्यात पोलीस आयुक्त यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे़. ......पोलिसांनी अडचणीतील नागरिकांना केलेली मदत१ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०१८ -   ७९७१ जानेवारी ते १४ मे २०१९ - १३३७

..........कालवा फुटीने जनता वसाहतीत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरुन लोकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते़ . अनेक जण पाण्यात अडकले होते़ दत्तवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी निलम गायकवाड यांनी अशा पाण्यात शिरुन एका मुलाला पाठीवर घेऊन पाण्यातून वाट काढत त्याला सुखरुप बाहेर आणले होते़. लोकमत ने या रणरागिणीचा फोटो प्रसिद्ध केला होता़. पोलीस आयुक्त डॉ़. कश्यप यांनी त्यांचा सन्मान केलाच.त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयात दर्शनी भागात हा फोटो फ्रेम करुन आपल्या कर्मचाऱ्याचे कौतुक केले होते़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी