पुणे : शहरात शांतता-सुव्यवस्था ठेवावी याकरिता पोलीस प्रशासनाने ‘डिजिटलाईज’ होण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला अद्याप वाहतूक विभागाला वाहनचोरीला आळा घालण्यात अपयश आले आहे. दिवसाला सरासरी सहा ते सात वाहनांची चोरी होत असून, गेल्या वर्षी शहर परिसरातून १७५७ दुचाकी चोरीला गेल्या, तर ५९ तीनचाकी आणि १५0 चारचाकी वाहनांची चोरी झाली आहे. मात्र हे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने ते वाढविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
२०१७मध्ये शहरातून एकूण मिळून २२१२ वाहने चोरीला गेली होती. २०१८मध्ये एकूण मिळून १९६६ वाहने चोरीला गेली आहेत. वाहनचोरीचे गुन्हे कमी झाले असले तरी अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण केवळ २९ टक्के एवढे आहे. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शाखेतील सर्व पथके तसेच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तुलनेने कमी असल्याची कबुली डॉ. के. वेंकटेशम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. वाहनचोरी रोखण्यासाठी ज्या भागातून वाहने चोरीला जातात,अशा भागांवर पोलिसांनी लक्षठेवावे, अशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.दुसरीकडे वाहतूक शाखेसाठी सीसीटीव्ही आणि ई-चलनडिव्हाईस मशीनचा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होताना दिसत आहे. याद्वारे वाहतूक शाखेने कोट्यवधी रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केले आहेत.वाहतूक शाखेने २0१८मध्ये सीसीटीव्हीद्वारे नियमभंग करणाºया ६ लाख ३३ हजार ४२४ जणांवर कारवाई केली. त्यापैकी ८७ हजार ६३७ केसेसमध्ये १ कोटी ८५ लाख ८९ हजार ७00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर ई-चलनद्वारे १२ लाख१४ हजार ५00 जणांवर कारवाईकरुन त्यापैकी ७ लाख २४ हजार४९४ जणांकडून १७ कोटी ५१ लाख१५ हजार २४२ रुपये दंड वसूल करण्यात आला.वाहतूक नियमभंग करणाºयांवर सीसीटीव्हीद्वारे करण्यात आलेली कारवाई