पुणे : राज्यभरात सुरू असलेल्या दूध दरवाढ आंदोलनाला पुण्यात वेगळं वळण मिळालं आहे. दुधाच्या गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सकाळी हडपसरमध्ये दुधाच्या टेम्पोची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफले, राज्य प्रवक्ते अनिल पवार, विध्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमोल हिपरंगे या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ही कारवाई हडपसर पोलिसांमार्फत करण्यात आली असून सध्या या पदाधिकाऱ्यांना नजीकच्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं आहे. दुधाला प्रति लिटर पाच रुपयांची दरवाढ मिळावी, यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यामुळे काल राज्यातील अनेक भागांमध्ये दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या. याशिवाय काही ठिकाणी दुधाची वाहतूक करणाऱ्या टँकर्सचीही तोडफोड करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 7:30 PM