शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

Pune Police: सायबर चोरट्यांकडून पुणे पोलीस लक्ष्य; पोलीस आयुक्त कुमारांच्या नावाने पैशांची मागणी

By भाग्यश्री गिलडा | Published: July 15, 2024 6:28 PM

माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये, अमितेश कुमार यांचे आवाहन

पुणे : सोशल मीडियाचा गैरवापर करत सायबर चोरट्यांकडून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आता तर पुणे पोलीस दलाच्या पोलीस आयुक्तांचे नाव आणि फोटो वापरून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. याबाबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हाट्सएप स्टेटस ठेऊन नागरिकांना संबंधित प्रतिसाद न देण्याचे आवाहन  केले आहे.

पोलीस आयुक्ता अमितेश कुमार यांचा फोटो डीपीवर ठेवून लोकांकडून पैशाची मागणी होत असल्याची माहिती त्यांनी आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटसद्वारे दिली आहे. "माझ्या फोटोचा गैरवापर करून नागरिकाकडून पैशाची मागणी होत आहे तरी अशा पद्धतीची कुठली रिक्वेस्टला किंवा मेसेजला रिप्लाय करू नये अशी विनंती" असे स्टेटस ठेवून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

सायबर चोरट्यांकडून मेसेज, लिंक पाठवून पैसे हडपण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही वेळा तर बँकेतून बोलतोय असे सांगूनही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. आयटी तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा अमिषाला बळी पडत आहेत. अशातच आता सायबर चोरटयांनी थेट पुणे पोलिसांनाच लक्ष्य केले आहे. आयुक्तांच्या नावे पैसे मागण्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आता सायबर चोरट्यांकडून पोलिसही सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी अशा वेळी कुठल्याही मेसेजला रिप्लाय देऊ नये. तसेच कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  

टॅग्स :Puneपुणेcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसcommissionerआयुक्तfraudधोकेबाजीMONEYपैसाSenior Citizenज्येष्ठ नागरिक