आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 09:36 AM2024-05-31T09:36:33+5:302024-05-31T09:40:50+5:30

पोर्शे अपघात प्रकरणात रक्तचाचणी अहवाल बदलणारे डॉ. तावरे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत...

pune porsche accident sunil tingare recommend Ajit Pawar dr ajay taware Satara | आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

आमदार टिंगरेंकडून डॉ. तावरेंची शिफारस व्हाया अजित पवार? भावाला केले सातारा जि. प. सदस्य

पुणे : वेगवेगळ्या आरोपांखाली चौकशी होत असलेला ससूनमधील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय तावरे यांना अधीक्षक करण्याची शिफारस आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच केली असल्याची चर्चा आहे. त्याला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी पुढे येत असून, त्यात प्रामुख्याने तावरे कुटुंब व अजित पवार यांच्यात निकटचे राजकीय कनेक्शन दिसून येत आहे. (pune porsche accident update, pune porsche crash, judge LN Dhanawad)

पोर्शे अपघात प्रकरणात रक्तचाचणी अहवाल बदलणारे डॉ. तावरे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. तिथे त्यांचे बंधू अभय तावरे आहेत. अभय तावरे हेही डॉक्टर आहेत. राजकारणाशी त्यांचा थेट संबंध नसताना आणि स्वपक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होत असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या डॉ. अभय तावरे यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची उमेदवारी दिली तसेच निवडूनही आणले, असे साताऱ्यातील काही जणांनी सांगितले.

Pune Porsche Case: ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावणाऱ्या धनावडेंना पत्रकारांनी घेरले, प्रश्न विचारताच काय केले?

ससूनमधील डॉ. तावरे यांची वेगवेगळ्या आरोपांखाली चौकशी सुरू आहे. तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी डॉ. तावरे यांना ससूनचे अधीक्षक करा, अशी शिफारस करणारे पत्र थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविले. मुश्रीफ यांनीही लगेचच त्या पत्रावर डॉ. तावरे यांना अधीक्षक करावे, अशी लेखी टिप्पणी केली. हे पत्र माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाले आहे.

अजित पवार यांच्या सांगण्याशिवाय डॉ. तावरे यांना ससूनचे अधीक्षक करण्यासाठी एक मंत्री व एक आमदार इतकी लेखी धडपड करणे शक्य नाही, असे राजकीय वर्तुळातील अनेकांचे म्हणणे आहे. येईल त्याला मंत्री किंवा आमदार कधीच शिफारस देत नाहीत. त्यासाठी तेवढाच वजनदार वशिला लागतो किंवा मग देवाणघेवाण तरी व्हावी लागते. या प्रकरणात वजनदार राजकीय वशिलाच असल्याचे दिसते आहे. डॉ. तावरे यांच्या चौकशीत याही मुद्द्याचा विचार व्हावा, असे आता या प्रकरणाच्या विरोधात पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: pune porsche accident sunil tingare recommend Ajit Pawar dr ajay taware Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.