ठळक मुद्देएप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईकारवाईत विनातिकीट प्रवास करताना आढळले १ लाख ४ हजार प्रवासी
पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत २ लाख १४ हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांच्याकडून तब्बल ११ कोटी १९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वेकडून पुणे-मळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या विभागात तिकीट तपासणीची मोहीम राबविली. एप्रिल ते डिसेंबर २०१७ दरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत १ लाख ४ हजार प्रवासी हे विनातिकीट प्रवास करताना आढळले असून त्यांना ५ कोटी ८६ लाख ७३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, वरिष्ठ व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.