पुणे : 27 जुलै 1925 राेजी सर्व पुणेकरांच्या मनात असलेली एेतिहासिक इमारत उभारण्यात अाली हाेती, ती म्हणजे पुणे रेल्वे स्टेशनची देखणी इमारत. अाज ही इमारत 94 व्या वर्षात पदार्पन करत अाहे. अाज या इमारतीचा वर्धापनदिन केक कापून माेठ्या उत्साहात साजरा करण्यात अाला.
इंग्रजांच्या काळापासून पुणे हे लष्करासाठी एक महत्त्वाचे ठिकाण हाेते. त्यामुळे मुंबई - पुणे रेल्वेसेवा सुरु करणे अावश्यक हाेते. सन 1922 मध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात अाले हाेते. या इमारतीचा अाराखडा पी विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1915 मध्ये तयार करण्यात अाला हाेता. मुख्य अभियंता जेम्स बेर्कक्ले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर 27 जुलै 1925 राेजी माेठ्या धुमधडाक्यात पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात अाले. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता.
पुणे स्टेशनला एेतिहासिक वास्तूचा दर्जा प्राप्त झाला अाहे. या स्टेशनमधून दरराेज लाखाे प्रवासी प्रवास करीत असतात. इतक्या वर्षात या इमारतीचे एेतिहासिक रुप तसेच ठेवण्यात अाले अाहे. पुणे स्टेशनची इमारत ही पुणे शहराची अाणि पुणेकरांची एक अाेळख म्हणून पाहिली जाते. 1930 साली पुणेकर तसेच मुंबईकरांच्या जीवाची डेक्कन क्वीन रेल्वे सुरु करण्यात अाली. इतक्या वर्षांनंतर डेक्क्न क्वीन या दाेन शहरांना जाेडण्याचे काम करीत अाहे.