शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पुणे रेल्वे स्थानक नाबाद ९४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 3:59 AM

केक कापून वर्धापन दिन साजरा

पुणे : भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करण्याच्या इराद्याने आलेल्या इंग्रजांनी कालांतराने देशाचा चेहराच बदलवून टाकला. पुण्यात आज दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक पुणे रेल्वे स्थानकाचा देखील यात समावेश होता. २७ जुलै १९२५ रोजी हे स्थानक उभारण्यात आले. बघता बघता या इमारतीला ९४ वर्षे पूर्ण झाली. शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवारी (दि. २७) पुणे रेल्वे स्थानकाच्या वास्तूने ९४ व्या वर्षात पदार्पण केले. वाढदिवसाचा कार्यक्रम रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला. याप्रसंगी कृष्णनाथ पाटील, ए. के. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. पुणे स्टेशनला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा प्राप्त झाला आहे. या स्टेशनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. इतक्या वर्षात या इमारतीचे ऐतिहासिक रूप तसेच ठेवण्यात आले आहे. पुणे स्टेशनची इमारत ही पुणे शहराची आणि पुणेकरांची एक ओळख म्हणून पाहिली जाते. १९३० साली पुणेकर तसेच मुंबईकरांच्या जिवाची डेक्कन क्वीन रेल्वे सुरू करण्यात आली. इतक्या वर्षांनंतर डेक्कन क्वीन या दोन शहरांना जोडण्याचे काम करीत आहे. मास्टर ॠषी गुप्ता यांनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी कृष्णनाथ पाटील, ए. के. पाठक, स्टेशन डायरेक्टर सुनील डोबाळे, डेप्युटी स्टेशन प्रबंधक गुरुराज सोनकांबळे, फढऋ मंजू मनिराग, रश्मी दळवी, गौतम ओहळ, महेंद्र सिंग, राममोहन मुरली मीना उपस्थित होते. इंग्रजांच्या काळापासून पुणे हे लष्करासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वेसेवा सुरू करणे आवश्यक होते.इमारतीचा खर्च होता ५ लाख ७९ हजारसन १९२२ मध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. या इमारतीचा आराखडा पी. विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मुख्य अभियंता जेम्स बर्कले यांच्या नियोजनाखाली बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर २७ जुलै १९२५ रोजी मोठ्या धूमधडाक्यात पुणे रेल्वे स्टेशनच्या इमारतीचे उद्घाटन मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये इतका खर्च आला होता.

टॅग्स :pune railway stationपुणे रेल्वे स्थानकPuneपुणेrailwayरेल्वे