शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

विधी विद्यार्थ्यांनी ठेवले पुणे रेल्वे स्थानकाच्या अस्वच्छतेवर ‘बोट’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 7:00 AM

केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने येणा-या प्रवाशांना मोठ्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देस्थायी लोकअदालतीत दाखल केली याचिका : स्वच्छतागृह, फलाट, रेल्वे मार्गावर दुर्गंंधी 

पुणे :  देशातील ऐतिहासिक रेल्वे स्थानक म्हणून गौरव असलेल्या पुणे स्थानकाच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने येणा-या प्रवाशांना मोठ्या अस्वच्छतेला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आता कायद्याचे शिक्षण घेणा-या तीन विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून केली आहे. यात सेंट्रल रेल्वे, पुणे विभागाला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दुर्गंधी अस्वच्छताविषयक समस्या मांडण्यात आल्या आहेत.  मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात शिकणा-या देवांगी तेलंग (वय२०), श्रृती टोपकर(२०) आणि निखिल जोगळेकर या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानकाच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. दरवेळी पुणे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत प्रशासन काम करते. मात्र स्थानक परिसरातील स्वच्छता नियमित ठेवण्यात त्यांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. यासगळ्या परिस्थितीचा अभ्यास करुन या तिन्ही विद्यार्थ्यांनी मिळुन सप्टेंबर 2018 मध्ये ज्येष्ठ विधिज्ञ व मानवी हक्क विश्लेषक अँड. असीम सरोदे यांच्या मदतीने याचिका दाखल केली.

यानंतर स्थायी लोकअदालतीचे न्यायाधीश सुधीर काळे आणि सदस्य रवीकुमार बिडकर, प्रमोद बनसोडे यांनी या प्रकरणावर ८ फेब्रुवारी रोजी काही सुचना केल्या. पुणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृह कमालीची अस्वच्छ आहेत. त्यांची वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने मोठ्या दुगंर्धीला सामोरे जावे लागते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाची तोडफोड झाल्याचे दिसून येते. याबरोबरच स्वच्छतागृहांमध्ये दिव्यांची सोय नाही. त्याकरिता वायरिंगचे काम केले असून प्रत्यक्षात दिवेच नसल्याने अडचण आहे. विद्युत बोर्ड नादुरुस्त आहेत. मुळातच ज्या संख्येने स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत त्यांची संख्या पुरेशी नसून जी आहेत ती बंद अवस्थेत असल्याचे विद्यार्थ्यांना आढळुन आले आहे. तसेच ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आहे अशा जागी प्रवाशांनी कचरा टाकुन अस्वच्छता केली आहे. रेल्वे मार्गावर, फलाट देखील कमालीचा अस्वच्छ झाल्याचे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी सांगितले.  संबंधित याचिका दाखल केल्यानंतर समितीचे अध्यक्ष काळे यांनी रेल्वे प्रशासनाला योग्य ते सुविधा तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले आहे. प्रत्येक फलाटावर स्वच्छतागृहांची पुरेशी संख्या असणे, फलाटावर स्वच्छता ठेवणे, सातत्याने त्यात सुधारणा करीत राहणे, याबरोबरच रेल्वे मार्ग आणि रेल्वे मार्ग ओलांडण्याकरिता वापरात येणा-या रेल्वेपुलावर देखील स्वच्छता ठेवण्याची सुचना त्यांनी केली आहे. यावर पुणे रेल्वे स्थानकाचे मुख्य स्वास्थ्य निरीक्षक नितीन शिंदे म्हणाले, जे विद्यार्थी पुणे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्याकरिता आले होते. त्यांना सर्व परिसर प्रत्यक्षात दाखविण्यात आला. सध्या अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांची कामे सुरु आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत. आता स्थानक परिसरात अस्वच्छता करणा-यांवर प्रशासन कडक कारवाई क रीत आहे.  रेल्वे स्थानकावर थुंकून घाण करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी देखील या कामाबाबत समाधान व्यक्त केले. 

* विद्यार्थ्यांनी वकील होण्याची वाट न पाहता शिक्षण सुरु असताना समाजपयोगी कामे करण्यावर भर द्यावा. आणि कायदेविषयक सर्जनशीलता तयार व्हावी या उद्देशातून स्थायी लोकअदालतीच्या माध्यमातून दाद मागण्यात येते. लोकांना पैसा खर्च न करता त्यांना न्याय मिळावा याकरिता त्यांचे प्रश्न मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. याबरोबरच समाजहिताच्या अनेक केसेस यानिमित्ताने अभ्यासता येत असून त्याच्यातील बदलांकरिता कार्यरत राहणे गरजेचे आहे. - अँड . असीम सरोदे 

* महाविद्यालयाच्यावतीने लिगल इन्टरव्हेंंशन नावाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. यात सार्वजनिक प्रश्नांना केंद्रभुत मानुन त्या सोडविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले.पीएमपी, सार्वजनिक रस्ता, पादचारी मार्ग आणि रेल्वे स्थानकावरील अस्वच्छता आदी समस्यांचा शोध आतापर्यंत विद्यार्थ्यांनी स्थायी लोकअदालतीत १० केसेस दाखल केल्या असून त्यापैकी दोन केसेसला न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तरुणांचा उत्साह आणि उर्जा याला बळ देण्याकरिता हा उपक्रम महत्वाचा आहे. - क्रांती देशमुख (प्राचार्य शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय) ......................

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकadvocateवकिल