शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पुण्यात दरवेळी पाऊस पडला की वाहतूक कोंडी का होते? काल घरी जायला चार तास लागले...

By हेमंत बावकर | Published: September 26, 2024 4:18 PM

Pune Rain Traffic Jam: बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पुण्यात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. विद्यापीठ चौकात तर चार-पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा पावसातच पुण्यात वाहतूक कोंडी का होते?

- हेमंत बावकर

पुण्यात गेले दोन-तीन दिवस तुफान पाऊस कोसळत आहे. आज तर पंतप्रधान मोदींनी पावसाच्या शक्यतेने पुणे दौरा रद्द केला आहे. बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पुण्यात सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती. विद्यापीठ चौकात तर चार-पाच किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. अशा पावसातच पुण्यात वाहतूक कोंडी का होते? याचे कारण म्हणजे सतत पाऊस पडायला लागला की लोक टूव्हीलर पार्किंगमध्येच ठेवून फोर व्हिलर बाहेर काढतात, हे आहे. 

पुण्यात आता कोणताच रस्ता चांगला राहिलेला नाही, हे दुसरे कारण आहेच. सर्व रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यामुळे यातून वाहन चालविताना त्याची गती संथच होत आहे. त्यात पाणी साचलेले असेल तर खड्ड्यात आदळावे लागते ते वेगळेच. यामुळे वाहनांची गती कमी झाली आहे.

आज पुण्यात दर व्यक्तीमागे गाड्यांची संख्याही कमालीची वाढली आहे. कोरोनापूर्वी सोसायट्यांच्या आवारातील पार्किंग गाड्यांसाठी पुरत होते, आता रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केलेली आढळतात. आज प्रत्येक घरात एका व्यक्तीमागे एक टूव्हीलर, एक-दोन फोर व्हीलर असे गुणोत्तर बनत चालले आहे. या त्याच फोरव्हीलर आहेत, ज्या पावसात भिजायला होते म्हणून बाहेर काढल्या जातात आणि मग तासंतास वाहतूक कोंडीत अडकून राहतात. ही परिस्थिती पुण्यातच नाही तर पिंपरी चिंचवडमध्येही आहे. 

काल पुण्यात अर्ध्या तासाच्या रोजच्या प्रवासासाठी टूव्हीलरला दोन-अडीज तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. फोर व्हीलरवाले तर चार-पाच तास अडकलेले होते. एसबी रोड, ल़ॉ कॉलेज रोड, विद्यापीठ रोड, शिवाजीनगर आदी भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कालच्या प्रवासात एक मोठा बदल जाणवला तो म्हणजे टूव्हीलरची संख्या कमालीची कमी झाली होती व फोर व्हिलरची वाढली होती. या वाढलेल्या फोर व्हिलरमुळेच पुण्यात पावसात प्रचंड वाहतूक कोंडी होते. औंध रोड आता पुण्यातील आयटी पार्कना जाण्यासाठी खुश्कीचा रस्ता झाला आहे. या रस्त्यावर तर वाहने ढिम्म हलत नव्हती. विद्यापीठ चौकात तेच होते. यामुळे पावसात भिजण्यापासून वाचायचे आणि वाहतूक कोंडीत तासंतास अडकायचे अशी परिस्थिती पुणेकरांवर आलेली आहे. 

मग का काढायची फोर व्हीलर...आयटी पार्कमुळे पुण्यात तरुण पिढी, मध्यम पिढीकडे प्रचंड पैसा आलेला आहे. हे लोक दररोज कार घेऊन बाहेर पडतात. कंपन्या या लोकांना कारसाठी मोबदलाही देतात. यामुळे आज एका कारमध्ये एकच व्यक्ती बसलेला दिसतो. लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे बहुतांश लोकांच्या मिटिंगाही कार चालविताना सुरु असतात. कारच्या म्युझिक सिस्टीमवरून मोबाईलवर बोलणे सुरु असते. इनोव्हा सारख्या मोठमोठ्या कारमध्ये एक व्यक्ती बसलेला असतो अशी परिस्थिती आहे. हे लोक ऑफिसला पोहोचतात कधी आणि आठ-नऊ तासांची शिफ्ट करून निघतात कधी असाही अनेकदा ही कोंडी पाहून प्रश्न पडलेला असतो. 

या लोकांचेही काय चुकतेय म्हणा... पुण्यात गेली अनेक वर्षे मेट्रोची कामे सुरु आहेत. उड्डाणपुलाची कामे सुरु आहेत. बांधलेला उड्डाणपूल तोडून तो पुन्हा बांधला जात आहे. यामध्येही वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावालाच आहे. पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायचे असल्यास दोन-तीन बस बदलाव्या लागतात. यात वेळ जातो. शिवाय बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नाही. मग ज्यांच्याकडे कार आहे, ऐपत आहे ते लोक एकटा का असेना कार घेऊन गारेगार एसीलावून बाहेर पडतात. मूळ पुणेकर काय की आता झालेले पुणेकर काय, कुठेतरी या गोष्टींचा विचार होण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTrafficवाहतूक कोंडी