पुणे: पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्ह्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांची शिष्टमंडळासह पुण्यात भेट घेतली. या भेटीत लांडेवाडी ता.आंबेगाव येथे घडलेल्या चोरीच्या आणि बलात्कारच्या घटना, धामणे ता खेड येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना तसेच एकवीरादेवी च्या कळस चोरी प्रकरणी आरोपीस अटक करण्यास होत असलेल्या विलंब याकडे लक्ष वेधले. दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी पहाटे मैलवस्ती लांडेवाडी, ता.आंबेगाव येथे चोरट्याने आजारी असेल्या वृध्द महिला भागुबाई ढेरंगे यांच्या घरी चोरी केली. तसेच भागुबाईच्या मदतीस असेल्या महिलेस जखमी करून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेतील तीनही आरोपी अद्याप फरार आहेत. याबाबत आ.गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक यांनी या घटनेचा पूर्विच्या मंचरमधील दरोडा घटनेशी संबध आहे का? या तपासबाबत चर्चा झाली तसेच या घटनेचे साम्य कोठेवाडी घटनेशी असल्याचे आ.गोऱ्हे यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. आ.गोऱ्हे यांनी अशा चोरीच्या घटनेत चोरांकडून लुटण्यात आलेल्या सोने, चांदी व इतर वस्तू विकत घेणाऱ्यांवर जो पर्यंत कडक कार्यवाही होणार नाही तो पर्यंत अशा घटनांना आळा घालणे अवघड असल्याचेही सांगितले. ही चोरी केल्यानंतर आरोपीने इतरत्र सात ठिकणी चोरी केल्याचे उघड झाले आहे. तरी देखील पोलीस प्रशासन कमी पडले असल्याने आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी खेद व्यक्त केला असून त्वरितआरोपी पकडण्याच्या कारवाईची मागणी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी हे गाव सर्वात मोठा सज्जा असल्याने याठिकाणी पोलीस चौकी देण्यात यावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली. धामणे, ता. खेड येथील घटनेला पाच दिवस झाले तरी सुद्धा आरोपींना अटक करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे कार्ला येथील एकवीरादेवी च्या कळसाची चोरी होऊन महिने झाले तरी देखील आरोपी पर्यंत पोलीस प्रशासनाला पोहोचता आलेले नाही. याबाबत नापसंती व्यक्त केली. पोलिसांकडून एकवीरा देवीच्या घटनेत अटकेत असलेल्या आरोपीची काही तंत्राच्या ऊपयोग करण्याची परवानगी कोर्टाने दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे. परंतु याचा उपयोग कितपत आरोपी शोधण्यास होईल हा प्रश्नच आहे,असे सांगून या वरील सर्व घटनेमुळे पुणे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने व या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी पुणें ग्रामिण भागातील वाहतूक यंत्रणेचा बोजवारा ऊडाला असून त्याबाबत त्वरित ऊपाययोजना आवश्यक आहे अशी मागणी शिष्टमंडळाने केली.चाकणला एमाआयडिसी भागात स्वतंत्र पोलीस स्टेशनची गरज गेली १० वर्षे मागणी केली जात असून या अधिवेशनात मा ना.देवेंद्र फडणविस यांच्याकडे पाठपुरावा यासाठी आ.नीलम गोर्हे प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधिक्षक श्री.सुवेझ हक यांना सांगीतले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, शिवसेना जिल्हा समन्वयक ॲड गणेशराव सांडभोर, खेडचे उप तालुका प्रमुख किरण गवारे, उद्योजक अविनाश तापकीर, आळंदीचे उपशहरप्रमुख संदिपराव पगडे, शाखाप्रमुख कैलासभाऊ गोपाळे, युवानेते गणेशराव शेळके उपस्थित होते.
पुणे: लांडेवाडीतील बलात्कार-चोरीप्रकरण व नगर जिल्हयातील कोठेवाडीच्या घटना एकाच प्रकारच्या :नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 8:28 PM