पुणे - महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण करून दिली. या महापुरुषांच्या आदर्शांपुढे वाटचाल करत जातीय सलोखा वाढवायचा आहे. असं सांगत त्यांनी फुले वाडा परिसरातील स्मारक उभारणीसंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं.पवार म्हणाले,'फुले वाड्याच्या आजूबाजूची जागा घेऊन एक प्रेरणादायी स्मारक उभारायचं आहे. यासाठी पुणे महापालिका आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. यात कुठलही राजकारण आणायचं कारण नाही. ज्यांच्या जागा घेतल्या जातील, त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणी, काही वेदना होतातच. पण समाजाच्या हितासाठी हे पाऊल आवश्यक आहे. पुढील जयंतीपर्यंत यामध्ये मोठा फरक दिसून येईल.
महात्मा फुले वाड्याच्या कामाबाबत अजित पवार म्हणाले,'भुजबळ साहेब असतील किंवा इतर कोणीही वेदना होतातच'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:15 IST