पुणे : कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षांपासून गणपतीची विसर्जन मिरवणुकीवर बंदी आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या ध्वनीप्रदूषणात कमालीची घट झाली आहे. दरवर्षी ध्वनीप्रदूषणाची पातळी ९० डेसिबल नोंदली जाते. परंतु, यंदा ही ६० नोंदली गेली आहे. जी नागरिकांसाठी सुसह्य आढळून आली. त्यामुळे यंदा पुणेकरांना अतिशय पर्यावरणपूरकरित्या गणरायाला निरोप दिला.
अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदव्युत्तर पर्यावरणशास्त्र संशोधन केंद्राच्या वतीने प्रा. डॉ. महेश शिंदीकर यांनी व त्यांचे स्वयंसेवक मुरली कुंभारकर, नागेश पवार, पद्मेश कुलकर्णी, शूभम पाटील, विनीत पवार, बालाजी नावंदे, शूभम अलटे यांनी सहभाग घेतला. प्रा. शिंदीकर हे गेली २० वर्षांपासून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी व रात्री ध्वनी प्रदूषणाची नोंद करतात. त्यातून वरील निरीक्षण समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरच्या पारंपरिक विसर्जन मिरवणूक मार्गावर गेल्या दोन वर्षात कोरोनच्या पार्श्वभूमीवर मिरवणुक रद्द करावी लागली. त्यामुळे या रस्त्यावर शांतता लाभली आहे. विसर्जन मार्गावरील १० चौकात नेहमीप्रमाणे आवाजाची पातळी नोंदली असता या वर्षीची सरासरी केवळ ५९.८ डेसिबल्स इतकी आढळली.
लक्ष्मी रस्त्याच्या सर्व चौकातील चोवीस तासांच्या एकंदर सरासरीत घट झाली. बऱ्याच वर्षातील नव्वदीच्या घरातून ही पातळी ५९ वर आली आहे. वेगवेगळ्या चौकातल्या नोंदीतही ध्वनीचे प्रमाण घसरल्याचे दिसले. गेल्या दोन दिवसांतील लक्ष्मी रस्त्यावरील (निवासी आणि व्यावसायिक क्षेत्र) ध्वनी पातळी दिवसा ६७.१ आणि रात्री ४५.२ नोंदली गेली आहे. जी नियमानूसारच्या मर्यादेच्या आसपास आहे. नियमानूसार निवासी भागात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबल्स पातळी हवी. व्यावसायिक भागात दिवसा ६५ व रात्री ५५ चा नियम आहे.ध्वनी मोजणीची वैशिष्ट्ये
- लक्ष्मी रस्त्यावरील २४ तासांतील आणि १० चौकात आढावा- मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे हे निरीक्षण नोंदवले- ही मोजणी स्थलकालपरत्वे आणि शास्त्रीय पध्दतीने केली जाते
विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवसांतील नोंद
चौक १९ सप्टेंबर २० सप्टेंबर सरासरी१) बेलबाग चौक ६० ते ६३ ४२ ते ६९ ५५.४ २) गणपती चौक ५८ ते ६८ ३६ ते ६८ ५५.१३)लिबंराज चौक ६५ ते ६९ ४९ ते ७१ ६२.८४)कुंटे चौक ६७ ते ७३ ३६ ते ६६ ५९.१५)उंबऱ्या गणपती चौक ६८ ते ७१ ३५ ते ६६ ६१.४६) भाऊसाहेब गोखले चौक ६३ ते ७० ३४ ते ६७ ५९.७७) शेडगे विठोबा चौक ५९ ते ६५ ३२ ते ७० ५७.६८)होळकर चौक ६४ ते ६९ ३३ ते ६८ ६०.८९)टिळक चौक ६५ ते ६७ ३४ ते ६७ ६१.०१०)खंडुजीबाबा चौक ६८ ते ७१ ३५ ते ७१ ६४.७ एकूण सरासरी ५९.८
गेल्या काही वर्षांतील ध्वनीप्रदूषण
२०१५ ९६.६२०१६ ९२.६२०१७ ९०.९२०१८ ९०.४२०१९ ८६.२२०२० ६५.५२०२१ ५९.८