विवेक भुसे -
पुणे : शहरात थंडीचा जोर वाढू लागला असून शनिवारी या हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमान १३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत हे २.५ अंश सेल्सिअसने कमी आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सर्वात कमी तापमान असलेले गेल्या दहा वर्षातील हे दुसरे वर्ष आहे.
२ नोव्हेंबर २००९ रोजी पुण्यात ११.४ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदविले गेले होते. त्या वर्षी ते नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी किमान तापमान ठरले होते. तसेच २ नोव्हेंबर २०१० मध्ये नोव्हेंबरमधील सर्वात कमी किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते.
देशभरातून २८ ऑक्टोबर रोजी मॉन्सून माघारी गेला होता. त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढू लागला. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागली. २ नोव्हेंबर रोजी १८.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर दररोज किमान तापमानात घट होऊ लागली आहे. शुक्रवारी शहरातील किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते. त्यात शनिवारी आणखी घट झाली.राज्यात शनिवारी सकाळी सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ११.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तापमानात घट होऊ लागली असून बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान १४ ते १८ अंश सेल्सिअसपर्यंत घटले आहे.राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घटले आहे. उत्तर भारतासह मध्य प्रदेशातील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे़...........
पुण्यातील नोव्हेंबर महिन्यात सर्वात कमी नोंदविलेले किमान तापमान (अंश सेल्सिअस)२० नोव्हेंबर २०१८ ११.४१३ नोव्हेंबर २०१७ ११.४२७ नोव्हेंबर २०१६ ९.३१८ नोव्हेंबर २०१५ १२.९३० नोव्हेंबर २०१४ ७.९१७ नोव्हेंबर २०१३ ९.९१९ नोव्हेंबर २०१२ ७.९१८ नोव्हेंबर २०११ १०.७२ नोव्हेंबर २०१० १३.८२ नोव्हेंबर २००९ ११.४............
थंडीत काळजी घ्याथंडीच्या काळात मास्कचा वापर आवश्यक करावा. थंडीमुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव या काळात वाढण्याची शक्यता असल्याने कोणतेही लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका़ तातडीचे तपासणी करुन घ्यावी.डॉ. मृत्युजंय महापात्र, महासंचालक, हवामान विभाग, दिल्ली