पुणे : पुणे शहरातील कमाल तापमानाचा पारा चांगलाच तापला असल्याने दिवसा घराबाहेर पडणे धोक्याचे ठरत आहे. आज (दि.३) व उद्या (दि.४) राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या घराबाहेर पडल्यानंतर प्रचंड उन्हाच्या झळ्या लागत आहेत. पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रात्रीचे तापमान काहीसे कमी झाले आहे. पण दिवसाचे तापमान मात्र चढेच आहे. पश्चिम वाऱ्यामुळे रात्री व सकाळी पुणेकरांना दिलासा मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाल्याचे पहायला मिळत आहे. आज सकाळी शिवाजीनगरचे किमान तापमान १८.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर शहरात सर्वाधिक किमान तापमान हे वडगावशेरीत २४.८, मगरपट्ट्यात २४.२, हडपसर २३.८ आणि कोरेगाव पार्कला २२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुण्यातील किमान तापमान
वडगावशेरी - २४.८मगरपट्टा - २४.२चिंचवड - २३.५लवळे - २१.५इंदापूर - २१.५ढमढेरे - २१.५पुरंदर - २०.७बारामती - १८.९शिवाजीनगर - १८.३लोणावळा - १४.३