पुणे: पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ पबमध्ये तरुणाई अमली पदार्थांचे सेवन करताना आढळल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, ड्रग्ज वितरणाची साखळी तोडण्यात पोलीस काही पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आलाय. पुण्यातील तरुणाई आज अमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव आहे. शहरात गेल्या वर्षी अवघ्या नऊ महिन्यांत विक्रमी १३ कोटींचे अमली पदार्थ गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. त्यामुळे शहरासाठी आणि तरुणांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी आपले मत व्यक्त केले आहे.
प्रशासनाने तात्पुरती कारवाई न करता कोणतीही घटना घडल्यावर नागरिकांच्या सहभागाने कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण पुणेकरांनी सर्व बार पब 2-3 दिवस बंद केले पाहिजे. आणि नियमावली तयार केली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पाटील म्हणाले, मी खुप विचार पूर्वक आवाहन करतो आहे. आता प्रमाण वाढले, चिंता वाढली हे नक्की आहे. त्यामुळे 70 लाख जनतेच शहर कामातून गेल्याची प्रतिमा तयार होत आहे. त्यामुळे पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. सगळ्यात चांगल्या शिक्षण संस्था पुण्यात असून पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे. इंडस्ट्री, वैद्यकीय सुविधा इथे जास्त आहे. प्रचंड विकसित होणाऱ्या जगामध्ये नावारूपाला येणाऱ्या देशातील 8 व मोठ शहर भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे मानले जाते. जगातील व्यसनामुळे पूर्ण वाया गेलेलं शहर अस प्रतिमा निर्माण करणं बंद केलं पाहिजे.
सर्व अँगल मिळून एक निर्णय धोरण ठरवू
उच्च व तंत्र शिक्षण या विभागातर्फे या आठवड्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयात एडिशनल व्हिजिटिंग पोस्ट मध्ये काही करता येईल का? कौंसिलींग साठी काही करता येईल का? यासाठी प्रयत्न करणार आहे. अधिवेशन उद्यापासून सुरु होतय. मंत्री मंडळ बैठक आहे. या अधिवेशनामध्ये पुण्यातील ड्रग्सचा विषय चर्चेचा आहे. सर्व लोकप्रतिनिधी यांनी यामध्ये सूचना मांडायला हव्यात. हे काही किराणा मालाचे दुकान नाही सात दिवस बंद करायला. सर्वच दुकान बंद करा आणि सर्व समाजाने एकत्र येऊन नियमावली तयार करा. पुण्यामधील मान्यवराची एक समिती गठित करून नियमावली ठरवली गेली पाहिजे. उद्यापासून अधिवेशन चालू होते आणि यामध्ये सरकार म्हणून किंवा विरोधक म्हणून चर्चा घडवून आणू. सर्व अँगल मिळून एक निर्णय धोरण ठरवू.