शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! पावसाचा पडला खंड, धरणात केवळ १४ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:32 AM

‘पुणेकरांनाे, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे.....

पुणे : गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला नाही, त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रात कमीच साठा झाला. यंदा मान्सून वेळेवर आला असला, तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे धरणसाठ्यात अजून तरी चांगला पाऊस पडलेला नाही. परिणामी पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी खालावली असून, केवळ १४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे ‘पुणेकरांनाे, काटकसरीने पाण्याचा वापर करा.’ वेळीच सावध व्हा; अन्यथा गत्यंतर नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे.

दरवर्षी घाट विभागात, धरणांमध्ये चांगला पाऊस होत असतो. यंदा मात्र अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. विशेष म्हणजे या आणि पुढील महिन्यात पावसात खंड पडणार आहे. सध्यातरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या धरण साखळीत केवळ ४.७१ टीएमसी पाणी आहे. हे प्रमाण अवघे १४.०१ टक्के आहे.

खडकवासला प्रकल्पात गेल्यावर्षी याच दिवशी ५.४८ टीएमसी पाणीसाठा होता. त्यावेळी उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण १८.७८ टक्के इतके होते. यंदा पुणे जिल्ह्यात शंभर टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिलेला आहे. तर देशात १०६ टक्के पाऊस होणार आहे. परंतु, सध्यातरी धरणांतील पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे.

पाच वर्षांतील नीच्चांकी साठा

खडकवासला प्रकल्पातील चार धरणांच्या माध्यमातून पुणे शहराला पाणीपुरवठा होतो. यंदाचा पाणीसाठा हा गेल्या पाच वर्षांतील नीच्चांकी पाणीसाठा आहे. शेतीचे आवर्तन, शहराला आवश्यक असणारे पाणी, बाष्पीभवन या सर्वांचा विचार करून पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. कारण सध्या प्रचंड उष्णता असून, या व पुढील महिन्यात पावसात खंड पडणार आहे.

खडकवासलातील पाणीसाठा (टीएमसी)

धरण - आताचा साठा - गतवर्षीचा साठा

टेमघर - ००.७ - ०.१४

वरसगाव - १.६३ - २.७४

पानशेत - १.४५ - १.३७

खडकवासला- ०.९३ - १.२३

एकूण - ४.७१ -५.४८

धरण साखळीत ४.७१ टीएमसी पाणी

मुठा खोऱ्यामधील चार धरणांची एकूण पाण्याची उपयुक्त क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून ४.७१ टीएमसी पाणी आहे. गतवर्षी जेमतेम झालेल्या पावसामुळे खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत ही धरणे कशीबशी भरली होती. गतवर्षी परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्यामुळे खडकवासला प्रकल्पात कमी पाणीसाठा झाला.

शहरात पाऊस, धरण क्षेत्रात गायब !

यंदा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे साठ्यात वाढ पाहायला मिळाली नाही. मान्सून वेळेवर आला असला, तरी त्यात दम नसल्याने म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. पुणे शहरात आणि जिल्ह्यातील शिरूर, इंदापूर, बारामती, दौंड या भागात पावसाने हजेरी लावली. शहरात ५ जूनपासून आतापर्यंत २०६ मिमी पावसाची नोंद झाली. जी सरासरी पावसाहून अधिक आहे. हा पाऊस १३५ टक्के झाला आहे.

धरण क्षेत्रात आतापर्यंतचा पाऊस

(१ जून २०२४ पासूनचा)

टेमघर - ९९ मिमी

वरसगाव - ८२ मिमी

पानशेत - ७९ मिमी

खडकवासला - ९४ मिमी

पुणे जिल्ह्यातील पाऊस

(१३ जूनपर्यंतची नोंद)

दौंड - १४८ मिमी

इंदापूर - २०१ मिमी

बारामती - २२४ मिमी

शिरूर - ११३ मिमी

पुरंदर - ८३ मिमी

भोर - ११२ मिमी

पुणे शहर - २०६ मिमी

मुळशी-पौड - ६६.७ मिमी

मावळ - ७२.६ मिमी

वेल्हे - ९५.१ मिमी

जुन्नर - ४१.८ मिमी

खेड - ५६.६ मिमी

आंबेगाव - ६१.९ मिमी

जून आणि जुलै महिन्यांमध्ये पावसात दोन खंड पडणार आहेत. या दोन महिन्यांत पाऊस कमीच असेल. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये ही पावसाची कमतरता भरून निघेल. कारण या दोन महिन्यांत चांगला पाऊस होईल. कमी वेळेत अधिक पाऊस असा पॅटर्न पावसाचा पाहायला मिळत आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणWaterपाणी