पुणे : जिल्ह्यात आठवडाभरापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. प्रमुख मोठी १४ धरणांतील पाणीसाठी ९० टक्क्यांहून अधिक झाला आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्याती हवेली, दौंड, बारामती आणि इंदापूरसाठी महत्त्वाचे असलेल्या खडकवासला प्रकल्पात २३.०२ टीएमसी (७८.९७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला, कळमोडी, वडीवळे आणि आंध्रा ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर वीर, कासारसाई, निरा देवघर, गुंजवणी, पानशेत, भामा आसखेड, पवना, चासकमान, वरसगाव, मुळशी, डिंभे, येडगाव, भाटघर, टेमघर, वडज आदी १५ धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे.
-----
उजनी धरणात ३५.११ टक्के पाणीसाठा जमा
पुणे, सोलापूर, अहमदनगरचा काही भाग तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या उजनी धरणात सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५.११ टक्के पाणीसाठा (१८.८१ टीएमसी) जमा झाला आहे. बंडगार्डन पूल येथून १३ हजार ८३० क्युसेक, तर दौंड येथून १७ हजार १८५ क्युसेक पाण्याच्या विसर्ग उजनी धरणात येत आहे.
------
चौकट
जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याची माहिती
धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी-टक्केवारी
टेमघर ३.७१ २.३४ ६३.०८
वरसगाव १२.८२ ९.६० ७४.८७
पानशेत १०.६५ ९.११ ८५.५५
खडकवासला १.९७ १.९७ १००
पवना ८.५१ ६.८७ ८०.७४
कासारसाई ०.५७ ०.४९ ८५.६२
मुळशी १८.४७ १३.८५ ६८.७२
कळमोडी १.५१ १.५१ १००
चासकमान ७.५८ ५.९१ ७७.९८
भामा आसखेड ७.६७ ६.११ ७९.६६
आंध्रा २.९२ २.९२ १००
वडीवळे १.०७ ०.९१ ८४.७३
शेटफळ ०.६० ०९ १५.४१
गुंजवणी ३.६९ ३.२४ ८७.७७
भाटघर २३.५० १४.९५ ६३.६३
नीरा देवघर ११.७३ १०.५४ ८९.८६
वीर ९.४१ ९.०७ ९६.४१
नाझरे ०.५९ ०.०७ १२.०३
पिंपळगाव जोगे ३.८९ ०.०४ ०.०४
माणिकडोह १०.१७ ३.२७ ३२.१०
येडगाव २.८० १.३३ ६८.२०
वडज १.१७ ०.५८ ४९.५६
डिंभे १२.४९ ८.०८ ६४.६६
चिल्हेवाडी ०.९६ ०.६२ ६४.९४
घोड ५.४७ १.२५ २५.७३
विसापूर ०.९० ०.०७ ८.२९
उजनी ५३.५७ १८.८१ ३५.११