शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पुण्याला ८१ दिवसासाठी उरले ७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 8:18 PM

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे..

ठळक मुद्देकाटकसरीने पाणी वापरावे; जलसंपदा विभागाचे पालिकेला पत्रकालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता

पुणे: महापालिका परिसर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात प्रकल्पात ७.०८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून जलसंपदा विभागाने येत्या १५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. परिणामी पुढील ८१ दिवसांसाठी आता केवळ सात टीएमसी पाणी उरले आहेत. पालिका प्रशासनाने अजूनही पाणीवापराबाबत काटकसर सुरू केलेली नाही.त्यातच पालिकेने उन्हाळ्यात पाणी जपून वापरावे, असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी पुरणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी कराराची मुदत संपुष्टात आली आहे.तरीही जलसंपदा विभागाकडून पालिकेला मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पालिकेला येत्या १५ जुलैपर्यंत १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पालिका परिसरात कोणतीही पाणी कपात न करता पाणी दिले जात आहे.तसेच शेतीसाठी सुध्दा गेल्या १४ दिवसापासून पाणी सोडण्यात आले असून एकूण २.६८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. आत्तापर्यंत सुमारे १.४५ टीएमसी पाणी कालव्यातून ग्रामीण भागापर्यंत दिले गेले असून अजूनही १.५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील अडीच महिन्यात सुमारे अर्धा टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे.त्यामुळेच पालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार पाणी वापरावे,असे पत्र जलसंपदा विभागातर्फे पालिकेला पाठविण्यात आले आहे.सध्या खडकवासला धरण प्रकल्पात केवळ ७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून पालिकेला १३५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. मात्र, पालिकेकडून १४०० ते १४५५ एमएलडी पाण्याचा वापर केला जात आहे.परंतु,पालिकेने अधिकचे पाणी वापरले तर येत्या १५ जुलैपर्यंत नागरिकांना पाणी पुरवणे कठिण जाणार आहे.त्यामुळे पालिकेने आत्तापासूनच काटकसरीने पाणी वापरणे गरजेचे आहे.--------------------खडकवासला धरण प्रकल्पात सध्या ७ टीएमसी एवढा साठा असून पुढील ८१ दिवस पुण्याताला सुमारे ४ टीएमसी पाण्याची आवश्यकता भासणार आहे.तसेच ग्रामीण भागासाठी सोडण्यात आलेले पाणी इंदापूरपर्यंत पोहचले असून आता दौंड भागात शेतीसाठी पाणी दिले जात आहे.त्यामुळे अजून दीड टीएमसी पाणी द्यावे लागणार असल्याने धरणातील ५.५ टीएमसी पाणीसंपणार आहे.तसेच अर्धा टीएमसी पाणी बाष्पिभवनात जाणार असल्याने येत्या १५ जुलैपर्यंत धरणातील ६.५ टीएमसी पाणी संपेल.मात्र,१३५० एमएलडी पाणी वापर झाला तरच हे शक्य आहे.परंतु,सध्या पालिकेकडून १४५० पेक्षा जास्त पाणी वापर केला जात असल्याने पाऊस लांबल्यास पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका