शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपची जोरदार फटकेबाजी; २ दिवसात १५८ प्रस्ताव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 8:05 PM

सर्वसाधारण सभेत ३४६ विविध प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले होते.

ठळक मुद्देसत्ताधारी पक्षाच्या सभासदांबरोबर विरोधी पक्षाच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळेच झाले शक्य

पुणे : दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने जोरदार फटकेबाजी करत तब्बल १५८ विविध विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. या सर्वसाधारण सभेत ३४६ विविध प्रकारचे प्रस्ताव मांडण्यात आले होते.

महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवार आणि बुधवारी झाली. दोन दिवसांच्या या सर्वसाधारण सभेत सात कार्यपत्रिकांवर चर्चा झाली. यामध्ये १५८ विषय मान्य करण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे दीड ते पावणे दोन वर्षांपासून अनेक गोष्टींवर बंधने आली. महापालिकेच्या कामकाजावर देखील याचा परिणाम झाला. पालिकेच्या सर्वसाधारण सभांना याचा फटका बसला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रस्ताव रखडले होते. त्यामुळे विकासाची कामे खोळंबली होती. 

कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर महानगरपालिकेला ऑफलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा घेण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार कोरोनाच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून हे कामकाज करण्यात आले. सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून सभागृहात हे विषय मांडून त्यावर आवश्यक चर्चा करत सभासदांच्या शंकाचे समाधान करत हे प्रस्ताव मांडून मान्य करण्यात आले, असे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या सभासदांबरोबर विरोधी पक्षाच्या सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यापुढील काळात देखील शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणारे प्रस्ताव सर्वानुमते मांडून एकमताने मान्य करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा राहणार असल्याचे बिडकर यांनी आवर्जून सांगितले. 

या प्रस्तावांना देण्यात आली मंजुरी....

- स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्ग खर्च- हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग अंशतः बदल- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाणपूल संरचना बदल खर्च-  समाविष्ट अकरा गावे डिपी सहा महिने मुदतवाढ- करोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या सेवकांसह रोजंदारी तसेच कंत्राटी कामगारांच्या वारसांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार अधिकाधिक मदत देणे.- शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्यासाठी ७२ ब नुसार निधी उपलब्ध करून देणे

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाElectionनिवडणूक