पुणे : पुण्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असताना पहिल्या डोसला प्राधान्य दिले जाते. पण आता शहरातील लसीकरण लवकरत - लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. अस अजित पवार यांनी सांगितलं.
मी स्वतः सहमत आहे की, बूस्टर डोस दिला पाहिजे, पण आधी १८ वर्ष वयाच्या जास्त लोकांना दोन्ही डोस देणं प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. असही ते म्हणाले आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीची माहिती दिली.
पवार म्हणाले, पुण्यात लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. गेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण झालंय. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तसंच लसीकरण जास्ती जास्त करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक स्तरावर माहिती घेतली तर ५ ते ६ लाख दररोज रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या लाटेची धोक्याची सूचना आहे. त्यापार्श्वभूमीवर काळजी घेतोय. चार आठवड्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता काळजी घेतली जात आहे. आवश्यक ती तयारी केली जात आहे.
डेंग्यू, टायफाईड पसरणार नाहीत
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया असे आजार पसरू लागतात. त्याचप्रमाणं अशुद्ध पाण्याने टायफाईड सारख्या आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असते. त्यावर बोलतां पवार म्हणाले, डेंग्यू, टॉयफाईड होणार नाही, पसरणार नाही याची काळजी आम्ही सर्वच घेत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांचे पथक लक्ष ठेऊन असणार आहेत.