पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सोलर सिटी योजनेत पुणे शहराची निवड करण्यात आली असून त्याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेच्या वतीने या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे.केंद्र सरकारचे आपारंपरिक ऊर्जा मंत्रालय व महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांमधून पुणे शहरात सौरऊर्जेपासून जास्तीतजास्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. किमान २० ते ३० टक्के विजेची बचत यातून व्हावी, असा उद्देश ठेवून हे काम करण्यात येणार आहे. या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवरच सोपवण्यात आली आहे. सौरऊर्जेची पॅनेल उभी करता येण्यासारख्या किती इमारती आहेत, त्यापासून साधारण किती वीजनिर्मिती होईल, खर्च किती होईल, सध्या लागणारी वीज किती, सौरऊर्जेपासून निर्माण होणारी वीज वापरण्यात आली तर किती बचत होईल आदी माहिती जमा करण्याचे काम महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. (प्रतिनिधी)
पुणे होणार सोलर सिटी
By admin | Published: May 02, 2017 4:43 AM