पुणे : सावत्र आईला माहिती होते की वडील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत आहेत, तरीही पोलिसांपासून माहिती लपवून ठेवणाºया सावत्र आईला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तिला १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोणे यांनी दिला आहे.ही घटना २0१३ ते २0१६ या कालावधीत ताडीवाला रस्ता परिसरात घडली. पीडित १६ वर्षीय मुलीने याबाबत बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३७ वर्षीय वडिलांना यापूर्वीच अटक केली आहे. आता सावत्र आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. वडिलांच्या त्रासाला कंटाळून तिच्या आईने आत्महत्या केली आहे. त्या प्रकरणामध्ये तिच्या वडिलांना अटक झाली होती. त्यामधून सुटून आल्यानंतर त्याने जिवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीवर बलात्कार केला. तिला मेडिकलमधून गोळी आणून तो खायला देत असे. याबाबतची माहिती तिने सावत्र आईला दिली. त्या वेळी आईने मारहाण करून तिला मेडिकल दुकानातून गोळी आणून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. समुपदेशनामध्ये शाळेत हा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आईला अटक केली.
पुणे : बलात्काराची माहिती लपविणा-या सावत्र आईला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 6:42 AM