पुणे - शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीची मानली गेलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. मात्र ते सगळेच प्रयोग फसल्याने या चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न उग्र बनत चाललेला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी या चौकात मेट्रोसह तीनमजली उड्डाणपूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा याची प्रतीक्षा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.विद्यापीठ चौकामध्ये शिवाजीनगर, पाषाण, बाणेर, औंध, चतु:शृंगी मंदिर, विद्यापीठ आदी अनेक ठिकाणचे रस्ते एकत्र येऊन मिळतात. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी २००६ मध्ये या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उडडणपुलाची रचना चुकल्याची कबुली दिली होती.उडडणपुलाच्या माध्यमातून शिवाजीनगरकडून येणारी वाहने थेट पाषाण, बाणेर, औंधला जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र पाषाण, बाणेर, औंधकडून येणाऱ्या वाहनांना शिवाजीनगरकडे जाण्यासाठी उडडणपुलावरून एकही मार्ग उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे या चौकातील वाहतूककोंडी जैसे थे राहिली आहे. त्यामुळे या चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढणाºया वाहनचालकांची दमछाक होते. पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करून वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मात्र या बदलांमुळे कोंडी सुटण्याऐवजी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था झाल्याने ते प्रयोग गुंडाळावे लागले आहेत. विद्यापीठ चौकात पाषाण, बाणेर, औंध या भागातून येणाºया वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगरकडून औंध, बाणेरकडे जाणाºया उडडणपुलाच्या रस्त्याचे दोन भाग करून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला.विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार हलविणारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात असलेले मुख्य प्रवेशद्वार गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा मार्केट येथे हलविण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूककोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या चौकामध्ये होणारे भविष्यातील मेट्रो स्टेशन, तीनमजली उड्डाणपूल आदीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.पादचाºयांचा संपेना त्राससावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाच्या परिसरामध्ये काही शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तेथून सतत ये-जा असते. मात्र या चौकातून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हा चौक आकाराने खूप मोठा आहे. मध्यंतरी झेब्रा क्रॉसिंगमध्ये बदल करून तुलनेने चौकातील अंतर कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे. पादचाºयांना सुरक्षितरीत्या चौक ओलांडण्यासाठी छोटे-छोटे आयलँड बांधण्याचा पर्यायही पुढे आला. मात्र अजूनही पादचाºयांचा सोसावा लागणारा त्रास संपलेला नाही.काही दिवसांपूर्वी पाषाणकडून येणाºया वाहतुकीमध्ये उड्डाणपुलाचा खांब येतो, त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जातात. त्यावर उपाय म्हणून खांबाच्या एका बाजूने तात्पुरते बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली. मात्र या बदलामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे काही तासांतच हा बदल मागे घ्यावा लागला.
प्रयोग फसले; वाहतूककोंडी कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 3:36 AM