शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

पुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास ;दुर्मिळ वनस्पतींच्या संवर्धनास मदत  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 8:05 PM

देशाच्या पश्चिम विभागात गुग्गुळ, सोनामुखी, इसबगोल, अश्वगंधा, सिताअशोक, बेल, शिवन, पाडळ, टेटू, अग्निमंथ, रानवांगी, सालवन, पीठवन, गोखरु, अनंतमूळ, खाजखुजली, बिवळा, बकुळ, पिंपळी, सफेदमुसळी, कोलीयस, लोध्र, वरुण, चित्रक अशा अनेक महत्त्वपूर्ण व प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात.

ठळक मुद्देपुणे विद्यापीठ करणार पश्चिम भागातील वनस्पतींचा अभ्यास दुर्मिळ होत चाललेल्या वनस्पतींचे होणार संवर्धन 

पुणे : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला ‘पश्चिम विभागीय औषधी वनस्पती तथा माहिती केंद्र’ मंजूर झाले आहेत. तसेच त्यासाठी 1 कोटी 67 लाख रूपयांचा निधी दिला जाणार असून या केंद्राच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन व त्या अनुषंघाने आवश्यक असलेले संशोधन करण्यात येणार आहे.

विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाला मंजूर झालेल्या ‘पश्चिम विभागीय औषधी वनस्पती केंद्राच्या अंतर्गत गोवा, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, दादरा-नगर हवेली आणि दीव-दमण या राज्यांचा व केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. दिगंबर मोकाट हे या केंद्राचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत, तर विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. अविनाश अडे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. देशात या पद्धतीची केवळ सात केंद्र निर्माण करण्यात आली आहेत. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह कोलकता येथील जाधवपूर विद्यापीठ , जोगिंदर नगर येथील आरआयआयएसएम , जबलपूर येथील शेर-ए-काश्मीर विद्यापीठ, वन संषोधन केंद्र , केरळा फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटयूट, आसाम अ‍ॅग्रिकल्चर विद्यापीठ यांचा समावेश आहे.

 डॉ. मोकाट म्हणाले, देशात व विदेशांत औषधी वनस्पतींची मोठी मागणी आहे. परंतु, अनेक कारणांमुळे ही औषधी वनस्पती संपदा नष्ट होऊ लागली आहे. परिणामी, औषधी कंपन्यांना व वैद्यांना कच्चा मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. देशाच्या पश्चिम विभागात गुग्गुळ, सोनामुखी, इसबगोल, अश्वगंधा, सिताअशोक, बेल, शिवन, पाडळ, टेटू, अग्निमंथ, रानवांगी, सालवन, पीठवन, गोखरु, अनंतमूळ, खाजखुजली, बिवळा, बकुळ, पिंपळी, सफेदमुसळी, कोलीयस, लोध्र, वरुण, चित्रक अशा अनेक महत्त्वपूर्ण व प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यांचे संवर्धन करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. पश्चिम विभागीय केंद्रामार्फत जाणार पाचही राज्यांमध्ये बाजारपेठेत असलेली मागणी व दुर्मिळ होत असलेल्या औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती, त्यांची शास्त्रशुद्ध लागवड केली जाईल.   

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण