शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

पुणे अनलॉक 4: महापालिका आयुक्तांचा पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा, ' हे ' निर्बंध राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 1:06 AM

काय सुरू आणि काय राहणार बंद? वाचा सविस्तर...

पुणे : केंद्र व राज्य शासनाने  ‘अनलॉक 4’ चे आदेश निर्गमित केल्यानंतर पालिकेनेही नवे आदेश जाहीर केले आहेत. काही प्रमाणात पालिकेनेही नागरिकांना दिलासा देताना काही निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. यापूर्वीच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणेच कार्यवाही सुरु राहणार आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, शिक्षण संस्था बंदच राहणार आहेत. यासोबतच जीम, सिनेमा हॉल, नाट्यगृहे, मनोरंजन पार्क,  धार्मिक स्थळे, जलतरण तलाव, सामाजिक, धार्मिक, राजकिय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा संमेलने यांनाही बंदी असणार आहे. परवानगी शिवाय आंतराष्ट्रीय विमानप्रवास करता येणार नाही. तसेच मेट्रो प्रवासासही मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट व अन्य आदरातिथ्य सेवा (वैद्यकीय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, विमानतळ, विलगीकरण केंद्र) येथील उपहारगृह सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. गुरुवारपासून पीएमपी सेवा सुरु होत आहेत. सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु ठेवता येणार आहेत. मात्र, येथील सिनेमागृह बंद राहणार आहेत. फुड कोर्ट, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा, घरपोच सेवा सुरु राहणार आहे. हॉटेल व लॉजेस यांना 100 टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यास आणि सर्व प्रकारच्या मैदानी शारीरिक खेळ व व्यायाम प्रकारांना परवानगी देण्यात आली आहे. फिजीकल डिस्टन्सिंग आणि अन्य सुरक्षेच्या नियमांमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. शासकीय आस्थापनांमधील अधिका-यांसाठी 100 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. तर कर्मचा-यांच्या 30 टक्के उपस्थितीत काम करावे लागणार आहे. ====सार्वजनिक व खासगी वाहतूकीसंदर्भात नियमावली टॅक्सी किंवा कॅबमधून एकावेळी वाहनचालक आणि तीन प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. तसेच आॅटो रिक्षामध्ये रिक्षाचालकासह अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. चारचाकी वाहनातून वाहनचालक आणि तीन प्रवासी तसेच दुचाकीवरुन केवळ चालकच हेल्मेट व मास्कसह प्रवास करु शकणार असल्याचे पालिका आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त