पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक मतदान केंद्रावर मतदारांचा रांगा लागल्याचे चित्र आहे. पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ५.५३ टक्के मतदान झाले आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७.४४ टक्के तर सर्वात कमी मतदान पिंपरी मतदारसंघात ४.०४ टक्के झाले आहे. तर जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६४ टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे.
दरम्यान, केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.