शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
2
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
3
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
5
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
7
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
8
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
9
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
10
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
11
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
12
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
13
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
14
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
15
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
16
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
17
दो भाई दोनों तबाही! शिखर धवन आणि युझवेंद्र चहलची भन्नाट कॉमेडी; चाहत्यांना हसू आवरेना
18
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
19
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
20
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत

पुणेकरांना आता २४ तास पाणीपुरवठा; येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 3:52 AM

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे एलअँडटीला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चा असलेल्या २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेला अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहराला चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइन, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्सच्या कामाच्या सहापैकी पाच कामे एलअँडटीला तर एक काम जैन एरिगेशनला देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या १५ दिवसांत योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातदेखील होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरासाठीची बहुचर्चित २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवºयात सापडली आहे. तब्बल २ हजार ६०० कोटींची या योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदा तब्बल २६ टक्के जादा दराने आल्या. यामुळे योजनेचा खर्च ३ हजार १०० कोटीपर्यंत गेला. या निविदांना विरोध झाल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढण्यास सांगितले. मूल्यवर्धित कराच्या आकारणीनंतर नव्याने पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. यामध्येसुद्धा फुगवटा केला जात असल्याचे समोर आल्यानंतर वाद झाला होता. अखेर नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर अखेर सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत निविदा प्रक्रियेला मान्यता देण्यात आली. यामुळे आता चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीमध्ये एलअ‍ॅण्डटी कंपनीला सहा निविदा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाल्यानंतर चौथ्या क्रमांकाची निविदा जैन एरिगेशन कंपनीला देण्याच्या उपसूचनेसह प्रस्ताव मान्य करण्यात आला. चोवीस तास पाणीयोजनेमध्ये पाइपलाइन टाकणे, केबल डक्ट, पाणी मीटर आणि मेंटेनन्स असे सहा भाग करण्यातआले आहेत. महापालिकाप्रशासनाने यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुमारे २३१५ कोटींचा हा प्रकल्प असून, २०५० कोटींच्या निविदा प्रशासनाला मिळाल्याआहेत. सरासरी १० ते १२ टक्केकमी दराने कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. सहाही भागांत एलअ‍ॅण्डटी कंपनीने कमी दराच्या निविदाआल्या आहेत.याविषयी महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले, की चोवीस तास पाणीपुरवठा योजना ही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची योजना आहे. पाणी बचतीसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. संपूर्ण शहरामध्ये ही योजना झाल्यास पुणे हे देशातील एकमेव शहर असेल. आपण सध्याचा विचार केल्यास ३५० लिटर प्रतिमाणसी पाण्याचा वापर करतो, असे असताना असमान पाणी शहरामध्ये मिळत आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य मोजमाप होण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. यामुळे पाण्याची गळती रोखण्यास मदत होणार आहे.प्रकल्पाची मुदत ५ वर्षे : प्रायोगिक आराखडा तयारमहापालिकेने २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेसाठी प्रायोगिक आराखडा तयार केला होता. यामध्ये शहरामधील पाच भाग निवडण्यात आले होते. कात्रज, सहकारनगर, येरवडा, तळजाई अशा भागांचा यामध्ये समावेश आहे. सुरुवातीला या ठिकाणी काम सुरू करण्यात येईल. त्याबरोबर शहरामध्येसुद्धा काम सुरू करण्यात येणार आहे.सुरुवातीला व्यावसायिक वापर होत असलेल्या मिळकतींना मीटर बसवण्यात येणार आहेत. यानंतर निवासी भागाला मीटर बसवण्यात येतील. योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहराचे ३२८ भाग करण्यात आले आहेत.या भागांमध्ये टाक्या आणि मोठे मीटर बसवण्यात येईल. प्रकल्पाची मुदत पाच वर्षे असून तीन वर्षांमध्ये काम पूर्ण होईल अशी अपेक्षाआहे, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.१४०० किलोमीटररस्ते योजनेसाठी खोदणारपुणे शहरामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असल्यामुळे विविध प्रकारच्या पाइपलाइन टाकण्यासाठी सुमारे १ हजार ४०० किलोमीटरचे रस्ते खोदावे लागणार आहेत.त्यामुळे महापालिकेकडून नव्याने तयार करण्यात आलेले सिमेंटचे रस्ते खोदण्याची वेळ येणार आहे. रस्ते खोदल्यानंतर त्याचा जोखमीचा कालावधी नष्ट होईल. परिणामी महापालिकेला रस्ते दुरुस्तीसाठी मोठा निधी उभारावा लागेल.आश्वासने पाळलीभारतीय जनता पक्षाने निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासन पाळले आहे. पुणेकरांसाठी पारदर्शक पद्धतीने चोवीस तास पाणीपुरवठा योजना आणली आहे. शहराच्या दृष्टीने ही महत्त्वाकांक्षी योजना असून लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.- मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्षदेशातील २४ बाय ७ पाणीपुरवठा करणारे पहिले शहरसंपूर्ण शहरामध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी झाल्यास पुणे हे देशातील पहिले शहर असेल. पुणे शहरामध्ये सर्वांत कमी दराने निविदा मिळाल्या आहेत. ही योजना भविष्याचा विचार करूनच आणण्यात आली असून, यामुळे तब्बल ८०० एमएलडी पाण्याची बचत होणार आहे.- कुणाल कुमार, महापालिका आयुक्त

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी