पुणे : आपल्या देशाला आवश्यकतेच्या ७५ ते ८० टक्के गॅस आणि तेल आयात करावे लागते. हे आपल्या देशात देखील तयार होऊ शकते आणि पुणे याचा केंद्रबिंदू बनत आहे. आधुनिक भारतात ऊर्जेला नव्या माध्यमातून पोहोचविण्याची जबाबदारी पुण्याने घेतली आहे. शहरातील आणि शेतीतील टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस बनविण्याची प्रक्रिया शहरात सुरु आहे. यातून स्थानिक अर्थव्यवस्था सुधारेल आणि शहर देखील स्वच्छ आणि सुंदर होईल. असे मत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्यावतीने निर्माण करण्यात येणाऱ्या शहरातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन बालेवाडीतील साई चौक येथे करण्यात आले होते. धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. सीएनजी स्टेशन वास्तूचे देखील भूमीपूजन यावेळी झाले. खासदार गिरीष बापट, अमर साबळे, आमदार चंद्रकांत पाटील, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, दिलीप वेडेपाटील, ज्योती कळमकर, एकनाथ पवार, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र नाटेकर, व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, स्वतंत्र संचालक राजेश पांडे, वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यावेळी उपस्थित होते. प्रधान म्हणाले, भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात स्वच्छ इंधन पोहोचविणे आणि गॅस आधारीत अर्थकारणासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला अनुसरुनच आज एमएनजीएल काम करीत आहे. देशातील क्रमांक ३ ची कंपनी हा नावलौकीक एमएनजीएलने त्यांच्या व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा यामाध्यमातून मिळविला आहे. सीएनजीला मोबाईल डिस्पेन्सरनेच विक्री करण्याची योजना देखील एमएनजीएलने राबवावी. एमएनजीएल केवळ व्यावसायिक अनुष्ठान नाही तर, राज्यात, देशात सामाजिक आणि हरित परिर्वतनाचे द्योतक बनेल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. ................................................................................................... ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला... चंद्रकांत पाटील म्हणाले, पेट्रोलियम मंत्रालयाने ५ वर्षात सामान्य माणसाचा विचार करुन जास्तीत जास्त योजना राबविल्या. ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणात चुलीसमोर स्वयंपाक करतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून आणि पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील चूलीची जागा गॅसने घेतली आहे. मागील ५ वर्षात आमच्या सरकारने केवळ ३७० चे राजकारण केले असे म्हणतात, परंतु ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला आहे असे पाटील यांनी सांगीतले...................................................................................................
पुणे विद्यानगरी बरोबरच आधुनिक ऊर्जा निर्मितीचे केंद्रबिंदू बनविणार : धर्मेद्र प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 5:23 PM
शहरातील आणि शेतीतील टाकाऊ वस्तूपासून बायोगॅस बनविण्याची प्रक्रिया शहरात सुरु
ठळक मुद्देशहरातील पहिल्या एमएनजीएल भवन या कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन ३७० तर केलेच, त्यासोबतच विकासही मोठ्या प्रमाणात केला...भारतात स्वच्छ इंधन पोहोचविणे आणि गॅस आधारीत अर्थकारणासाठी प्रयत्न