पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) डिझेलवरील गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या वाढविण्यात येत आहेत. पुणे विभागातून सध्या ४३ शिवनेरी आणि २७ शिवाई बस धावत आहेत. परंतु लालपरी कमी झाल्याने नव्याने गाड्यांची संख्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे नव्या इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आली असून, पुढील दोन महिन्यांत १३४ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.एसटी महामंडळाकडून लालपरीमुळे होणारी प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या विविध सवलतींमुळे एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. शिवाय इलेक्ट्रिक बसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गावर इलेक्ट्रिक बस धावत आहेत. पुढील काळात या मार्गावर इलेक्ट्रिक बसची संख्या वाढविण्यात आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा फायदा होणार असून, बसची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मार्गावर इलेक्ट्रिक बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच १३४ इलेक्ट्रिक बस पुणे विभागात दाखल होणार आहेत. -प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग