पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:16 PM2019-11-19T14:16:07+5:302019-11-19T20:20:07+5:30
आरक्षण झाले जाहीर : इच्छुक सदस्यांची पक्षश्रेष्ठींकडे मोचेर्बांधणी
पुणे : पुणे जिल्ह्यात अध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक सदस्यांनी पक्षश्रेष्ठींकडे ही माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून मोचेर्बांधणी सुरु केली आहे. पक्षश्रेष्ठी या पदासाठी कोणाची निवड करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अध्यक्ष पदाचे आरक्षण मंगळवारी राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता याच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जिल्हापरिषदेचे आरक्षण लांबणीवर पडले होते. अध्यक्षपद आणि सभापतिपदाचे आरक्षण संपल्याने काही महिने त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. याविरोधात काहीजणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र निवडणुका जाहीर झाल्याने यावर निर्णय होऊ शकला नाही. विधानसभा निवडणुकां आटोपल्या असून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी मुंबईत मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव अजय मेहेता यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.चक्राकार पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. या वेळी 34 जिल्हा परिषदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यात अध्यक्षपद हे खुल्या प्रवगार्तील महिलेसाठी राखीव झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे गेल्या 27 वर्षात खुल्या प्रवगार्साठी आरक्षित होते. खुल्या गटातील महिलेसाठी पद आरक्षित झाल्याने इच्छुक सदस्यांनी ही माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषदेत 13 महिला या सर्व साधारण गटातून निवडून आल्या आहेत. यांच्यातून एकाच्या गळ्यात अध्यक्ष पदाची माळ पडणार आहे. कांचन कीर्ती निर्मला पानसरे, कुसुम मांढरे, मीनाक्षी तावरे, रोहिणी तावरे, राणी शेळके, अनिता इंगळे, पूजा पारगे, अर्चना कामठे, कल्पना जगताप, शोभा कदम, तुलसी भोर, अरुण थोरात, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार या महिला सदस्या खुल्या प्रवगार्तील आहेत.राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत :
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर